problem of sewage drainage in Dapodi sewage water entered house during Diwali Citizens health Sakal
पिंपरी-चिंचवड

Sangvi News : दापोडीतील सांडपाणी ड्रेनेजचा प्रश्न गंभीर, ऐन दिवाळीत घरात शिरले सांडपाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत नागरिकांची मागणी

रमेश मोरे

जुनी सांगवी : दापोडी येथील अरूंद गल्ल्या, वस्ती चाळीचा भाग आणी वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या जयभिम नगर,पिलाजी काटे चाळ,अत्तार विट भट्टी परिसरातील रहिवासी नागरिकांच्या घरामध्ये पावसाळी पाण्यासह चेंबर तुंबल्याने घाण पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

पाऊस आल्यावरच हा प्रकार घडत नसून येथील विस ते पंचवीस घरांना तुंबलेली गटारे, तुंबलेल्या ड्रेनेजमुळे गेली अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. शुक्रवार ता.१० सायंकाळी आलेल्या अवकाळी पावसामुळे येथील पिलाजी काटे चाळीतील सेवावाहिन्या तुंबल्याने नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरल्याने ऐन दिवाळीत रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

एकीकडे प्रशासन मात्र गेली चार महिन्यांपासून येथील पाहणी केली,कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.काम करण्यात येईल अशी आश्वासने देऊन वेळकाढूपणा करत आहेत.

येथील प्रश्न कायमस्वरूपी उपाययोजना करून सोडवावा अशी मागणी येथील रहिवाशांमधून होत आहे.

सांडपाणी , पावसाळी पाणी,ड्रेनेज सर्व वाहिन्या एकाच वाहिनीवर असल्याने येथे पाणी तुंबण्याचा कायमस्वरूपी प्रश्न आहे.या परिसरात कष्टकरी चाळी वस्तीत राहातात.अरूंद गल्ल्या,नविन वाहिन्या टाकण्यासाठी जागा नसल्याचे कारण देत येथे वर्षांनूवर्षे जैसे थे परिस्थिती आहे.अशातच येथील नागरिकांनी रहिवास करावा लागत आहे.

परंतु महापालिका प्रशासन यावर कायमचा तोडगा काढत नसल्याने स्थानिक रहिवाशांची मोठी तारांबळ उडत आहे. दरवर्षी पावसाळ्यात गटार तुंबल्याने पावसाचे पाणी घरामध्ये शिरते तर सातत्याने गटार तुंबल्याने गटारीचे दूषित पाणी देखील वारंवार नागरिकांच्या घरात शिरत असल्याने येथील स्थानिक रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

-महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आजवर या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घातलेले नसल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.मोठ्या पावसात चेंबर तुंबल्याने गटारीचे दूषित पाणी,घाण पाण्याच्या घरात घुसण्याच्या प्रकारामुळे नागरिकांना अशातच रहिवास करावा लागत आहे.

प्रशासन म्हणतेय अरूंद जागा- संबंधित स्थापत्य,जलनिसारण विभाग, आरोग्य विभागाकडून नेहमी तात्पुरत्या स्वरूपात तुंबलेले चेंबर स्वच्छ करणे,कचरा काढणे असे तात्पुरते स्वरूपात काम करून येथील प्रश्नाला बगल देण्याचे काम करण्यात येत आहे.

-कायमस्वरूपी स्वतंत्र वाहिन्या टाकण्याची मागणी -

येथे एकाच वाहिनीवर सर्व भार असल्याने वाहिनीवरील ताण कमी करण्यासाठी मार्ग बदलून अथवा नवीन वाहिन्या टाकून येथील कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

गेली अनेक वर्षांपासून आम्हाला पावसाळा असो की उन्हाळा हा कायमच त्रास आहे. कालच्या पावसामुळे ऐन दिवाळी सणात घरात घाण पाणी आल्याने रात्री पाणी बाहेर काढण्यात रात्र घालवावी लागली. नाविलाजास्तव अशा परिस्थितीत राहावे लागत आहे.अनुजा जाधव रहिवासी

अनेक वेळा तक्रारी करूनही कुणीही लक्ष देत नाहीत.हा प्रश्न स्थानिक रहिवाशांनी जनसंवाद सभेत जाऊनही मांडला आहे.मात्र तात्पुरत्या स्वरूपात डागडूजी करण्यात येते.मुळप्रश्न जैसे थे आहे.येथील कायमस्वरूपी प्रश्न सोडवावा

- ज्योती चक्रनारायण,शारदा थोरात, सुनिल हिवाळे रहिवासी.

येथील संपूर्ण परिसराची पाहणी करून आराखडा तयार करण्यात आला आहे. अरूंद गल्ल्यांमुळे कामास अडचणी येतात.दिवाळी नंतर येथील कामे करण्यात येतील.येथील स्वच्छता करण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत.

विजय जाधव अभियंता जलनि:सारण विभाग ह क्षेत्रिय कार्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT