Tukaram_Beej 
पिंपरी-चिंचवड

संत तुकाराम महाराज बीज सोहळा होणार की नाही; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

सकाळ वृत्तसेवा

देहू (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 30 मार्च रोजी असणारा संत तुकाराम महाराज बीज सोहळा 50 भाविकांच्या उपस्थितीत घेण्यात यावा. सदर सोहळ्यास उपस्थित असलेल्या 50 भाविकांची कोरोना चाचणी करून त्यांची यादी पोलिस प्रशासनाकडे देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. संत तुकाराम महाराज बीज सोहळा येत्या 30 मार्चला आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दरवर्षी देहूत येत असतात. बीज सोहळ्याच्या दहा दिवस अगोदर गावात जागोजागी गाथा पारायण सोहळे सुरू होतात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सोहळा होणार की नाही, याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता आहे. बीज सोहळ्यासंदर्भात मंगळवारी (ता.१६) देहूत आढावा बैठक झाली. हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर, अप्पर तहसीलदार गीता गायकवाड, नगर पंचायतीचे प्रभारी तहसीलदार मधुसूदन बर्गे, संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, पोलिस निरीक्षक विलास सोंडे आणि इतर उपस्थित होते. याबाबत मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले, शासनाला संस्थानच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे पालखी सोहळा संपन्न झाला. त्याप्रमाणे बीज सोहळा शासनाच्या आदेशानुसार आणि संस्थानच्या परंपरेनुसार होईल.

दरम्यान हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी संस्थानचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यानुसार बीज सोहळ्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश संस्थानला प्राप्त झाले आहेत. या आदेशात परराज्यातून येणाऱ्या भाविकांना न येण्याचे आवाहन संस्थानतर्फे करावे, बीज सोहळा घरी बसून भाविकांना पाहता येईल याची व्यवस्था करावी. पोलिस आयुक्तांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973नुसार प्रतिबंधात्मक आदेश पारीत करावेत. स्थानिक पोलिस ठाण्याच्या मार्फत पासेस देण्याची व्यवस्था करावी. तसेच यात्रा काळात प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार गीता गायकवाड, मधुसूदन बर्गे यांना इन्सिडंट कमांडर म्हणून नियुक्तीचे आदेश दिले आहेत.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT