crime news 
पिंपरी-चिंचवड

ब्लाऊजनं गळा आवळून सासूचा खून, पिंपरीत मुलगा-सूनेला अटक

नामदेव कुंभार

किरकोळ भांडणातून सूनेनं ब्लाऊजनं गळा आवळून सासूचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमधील तळेगाव दाभाडे येते ही घटना घडली आहे. खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून जंगलात फेकला. हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पूजा मिलिंद शिंदे (22 वर्ष) आणि मिलिंद गौतम शिंदे (29 वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर खून जालेल्या महिलेचं नाव बेबी गौतम शिंदे असं आहे. त्या 50 वर्षाच्या होत्या. (Pune: Daughter-in-law arrested for killing 50-year-old woman)

21 मे रोजी सासू बेबी शिंदे आणि सून पूजा शिंदे यांच्या किरकोळ भांडण झालं होतं. त्यानंतर त्याचाच राग मनात धरुन पूजा शिंदे हिने सासूचा ब्लाऊजनं गळा आवळून खून केला. नवऱ्याच्या साह्यानं मृतदेहाची विल्हेवाट लागली. एका पोत्यात मृतदेह भरुन जंगलात फेकला. मात्र, शिंदेंच्या शेजांऱ्यांनी ही घटना उघडकीस आणली.

मृतदेहाची विल्हेवाट लावताना शेजारील तरुणांनी पूजा शिंदेला पाहिलं. शंका आल्यामुळे तात्काळ पोलिसांत कळवलं. पोलिसांनाही घटनास्थळावर धाव घेत खूनाचा उलगाडा केला. पूजा मिलिंद शिंदे आणि मिलिंद गौतम शिंदे या दोघांनाही तळेगांव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT