पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील राखी उत्पादकांना सतावतेय 'ही' चिंता, तर विक्रेते म्हणतायेत...

सुवर्णा नवले

पिंपरी : राखी हा भावा-बहिणींच्या नात्यातील गोडवा जपणारा सण. राखी म्हणजे अतूट बंधन. मात्र, कोरोनाचे सावट दिवसेंदिवस गडद होत असल्याने राखी उत्पादकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात लाखों रुपयांची उलाढाल या व्यवसायातून दरवर्षी होते. अद्यापपर्यंत राखीचे स्टॉल सुरू करण्याचे आदेश न आल्याने किरकोळ विक्रेत्यांसह ठोक-विक्रेत्यांना मोठा फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे.

3 ऑगस्टला राखीचा सण घरोघरी साजरा होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात व्रिकेत्यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी शहरात रस्त्यावरच व्यवसाय थाटणारा हा वर्ग सर्वाधिक आहे. पोस्टाने व कुरिअरने हजारोंच्या संख्येने राख्या घरोघरी पाठविल्या जातात. सैन्यदलातही पाठविल्या जातात. मात्र, शहरात संसर्ग रोखण्यासाठी दहा दिवसांचा अचानक लॉकडाउन जाहीर झाला. केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरू आहेत. घराघरांत साजरा होणाऱ्या या सणासाठी 19 जुलैपासून परवानगी मिळणे गरजेचे आहे, अन्यथा तयार झालेल्या होम मेड राख्या विनाकारण पडून राहणार आहेत. राखीमध्ये असलेले मणी, दोऱ्या, कुंदन हे काळे पडत असल्याने त्याचा साठा करून ठेवणे अवघड आहे. केवळ दुकानांना परवानगी न देता स्टॉलला परवानगी दिल्यावरच या व्यवसायाला उभारी मिळू शकते, असे चिंचवड येथील राखी विक्रेते पल्लवी नायक यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंध-अपंगाच्या रोजगारावरही संकट

आजही राखीची हस्तकला टिकून आहे. ते केवळ या व्यवसायात नैपुण्य मिळविलेल्या कारागिरांमुळे. राखीचे हे अर्थचक्र दरवर्षी शेकडो कारागिरांच्या माध्यमातून फिरते. यामाध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळतो. यात अंध व अपंग वर्गही मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. राखी चिकटविणे, सजविणे, पॅकेजिंग करण्यापर्यंत या कामात गुंतलेला वर्ग मोठा आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचे संकट असले, तरीही नात्यांची वीण घट्ट करणारी ही राखी घेण्यासाठी अनेक ग्राहक (महिला) बाजारपेठेत येणार आहेत. 24 जुलै रोजी लॉकडाउन संपताच राखी खरेदीसाठी अनेक व्यावसायिक घाऊक व्यावसायिकांकडे खरेदीसाठी जाणार आहेत. ग्राहकांची पावले सुद्धा बाजारपेठेत वळणार आहेत. बाजारपेठेत गर्दी वाढू शकते. मात्र, सर्व नियमांचे पालन करून व्यावसायिक ग्राहकांना योग्य सेवा देऊ शकतील. ग्राहकांना राखी खरेदीसाठी पुरेसा वेळ सुद्धा मिळेल. शहरातील सर्व राखी निर्माते, कामगार व विक्रेते हे घटक एकमेकांवर निर्भर आहेत. राख्यांची विक्री न झाल्यास पुढील काही महिन्यात उत्पादन बंद ठेवावे लागेल. यामुळे हजारो जण वर्षभरासाठी बेरोजगार होतील.
- सीमा कुंकुलोळ, राखी विक्रेते, चिंचवड

आकडे बोलतात

  • एकूण स्टॉल विक्रेते : 800 ते 1000
  • उलाढाल : 5 ते 10 करोड
  • उत्पादक : 60 ते 70
  • घरोघरी राख्या बनविणारे व्यावसायिक : 2500 ते 3000
  • महिन्याकाठी प्रती व्यक्ती रोजगार : 5 ते 6 हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT