Corona Test Sakal
पिंपरी-चिंचवड

वडगाव मावळ : एकाच कंपनीतील १६१ कामगारांचे अहवाल पॉझिटिव्ह

मावळ तालुक्यातील बऊर गावच्या हद्दीतील एका कंपनीमध्ये १६१ कामगारांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ - मावळ तालुक्यातील बऊर गावच्या हद्दीतील एका कंपनीमध्ये १६१ कामगारांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एखाद्या आस्थापनामधील कामगारांचे एवढ्या मोठ्या संखेने कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच घटना असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या कामगारांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असले तरी त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळली नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे सर्वांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाच्या नव्या आदेशानुसार कोणत्याही आस्थापनामधील लस न घेतलेल्या कामगारांची आरपीटीसीआर चाचणी करणे बंधनकारक झाले आहे त्यानुसार बऊरमधील एका कंपनी प्रशासनाने सोमवारी (ता. १२) ३७५ कामगारांची आरटीपीसीआर टेस्ट खासगी लॅबमध्ये केली होती.

शुक्रवारी व शनिवारी त्यातील १६१ कामगारांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यांनी याची माहिती शासकीय आरोग्य खात्याला कळविल्यानंतर मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली येळसे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र मोहिते, डॉ. संदीप मुंडे, आरोग्य सेवक केतन जाधव, आरोग्य सेविका विना धुरंधर, आशा सेविका लता वाळुंजकर आदींच्या पथकाने या १६१ कामगारांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली. टेंपरेचर, ऑक्सिजन लेवल आदी बाबींची तपासणी केली. कोणत्याही कामगारांमध्ये लक्षणे आढळून आली नाहीत. घरी स्वतंत्र व्यवस्था असल्यास गृहविलगीकरणात अथवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला अशी माहिती डॉ. मोहिते यांनी दिली. उर्वरित कामगारांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. दरम्यान, एवढया मोठ्या प्रमाणावर कामगारांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची स्थिती चांगली असल्याने ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT