पिंपरी-चिंचवड

'या' दरोडेखोराच्या मागावर होते अकरा पोलिस ठाण्याचे पोलिस, पण शेवटी...

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : चार जिल्ह्यातील पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात टोळीतील एका अट्टल दरोडेखोराला अखेर जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला यश आले आहे. पाच वर्षांपासून फरारी असलेल्या या दरोडेखोराच्या मागावर अकरा ठाण्याचे पोलिस होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अजय ऊर्फ आज्या ऊर्फ अजित आशोक शिंदे (वय 25 वर्ष रा. निमगाव दावडी ता. खेड, जि पुणे) असे या दरोडेखोराचे नाव आहे. शिंदे हा खेडमधील पाराडी येथील डोंगरामध्ये निर्जनस्थळी कुटुंबासह वास्तव्य करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याचा शोध घेतला असता शिंदे त्याठिकाणी राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गुन्हे शाखा युनिट पाचच्या कार्यालयात आणून सखोल तपास केला असता त्याने तो खेड तालुक्‍यातील कुख्यात दरोडेखोर रमेश बाळु पडवळ या टोळीचा सदस्य असल्याचे त्याने सांगितले.  त्यांच्या टोळीने पुणे, अहमदनगर, रायगड जिल्ह्यामधील विविध ठिकाणी दरोडे टाकल्याचीही कबुली त्याने दिली. 

आरोपी शिंदे याच्यावर तळेगाव दाभाडे, शिरूर, पारनेर या पोलिस ठाण्यात प्रत्येकी दोन तर खालापूर, रांजणगाव, खेड, कोतवाली या ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.  शिंदे हा सुमारे पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत पुणे जिल्हयातील वेगवेगळया निर्जन ठिकाणी राहत होता. 

दरम्यान, त्याचा पुणे ग्रामीणकडील मंचर, रांजणगाव, वडगाव मावळ, खेड, आळेफाटा, शिक्रापुर पोलिस तर अहमदनगर जिल्हयातील पारनेर, कोतवाली, राहुरी, बेलवंडी पोलिस यासह रायगड जिल्हयातील खालापुर पोलिस ठाण्याकडील तपास पथके शोध घेत होती. त्याला पुढील तपासासाठी तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT