RTE School Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : आर. टी. ई. प्रवेश नाकारल्याप्रकरणी २४ शाळांची होणार सुनावणी

आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या शैक्षणिक वर्षाकरिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे, माञ अशा विद्यार्थ्यांना शहरातील २४ शाळांनी विविध कारणांनी प्रवेश नाकारला आहे.

प्रशांत पाटील

पिंपरी - आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या (RTE Admission Process) शैक्षणिक वर्षाकरिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे, माञ अशा विद्यार्थ्यांना (Student) शहरातील २४ शाळांनी विविध कारणांनी प्रवेश (Admission) नाकारला आहे. अशा शाळांना (School) सुनावणीला बोलविण्यात येणार आहे. वेळप्रसंगी शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गोडसे यांनी दिली.

या प्रवेश प्रक्रियेत लॉटरीद्वारे निवडलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांनी ३१ जुलै २०२१ पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. परतू अनेक शाळांनी शुल्क परताव्यासाठी प्रवेश नाकारला आहे. काही शाळांनी वय बसत नसल्याची कारणे पुढे केली आहेत. त्यामुळे निवड यादीतील बहुतांश पाल्यांचे प्रवेश खोळंबले आहेत. अशा अनेक पालकांनी २४ शाळांविरोधात आरटीई पालक संघाकडे तक्रारी केल्या आहेत. यात सर्वाधिक एसएनबीपी चिखली शाळेविरूद्ध आहेत. पालक संघाने पुणे जिल्हा परिषदेकडे पालकांच्यावतीने दाद मागितली आहे. याची मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दखल घेतली असून या शाळांना सुनावणीला येत्या दहा ऑगस्ट रोजी बोलावले आहे. सुनावणीनंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतचे आदेश देण्यात येणार आहेत. ज्या शाळा आडेबाजी करत आहेत, अशा शाळांवर कारवाई करण्याशिवाय पर्याय नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘शहरातील २४ शाळांनी पालकांना स्पष्टपणे प्रवेश नाकारले आहेत. त्यामुळे गरीब मुलांचा हक्क डावलला जात आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून कूठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने आम्ही अशा शाळांवर निश्‍चित कारवाई करणार आहोत. त्या शाळांची सुनावणी घेणार असून वेळप्रसंगी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल. ’’

- अशोक गोडसे, शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT