pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

एस. टी. घडवणार साडेतीन शक्‍तीपीठांचे दर्शन

पिंपरी चिंचवड आगारातून विशेष बसगाड्या

आशा साळवी - सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्त महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) पिंपरी चिंचवड आगारातून शनिवारी (ता.९)साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. सकाळी सहा वाजता सोडण्यात येणार आहे, तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन वरीष्ठ लिपिक आर.टी. जाधव यांनी केले आहे.

ही यात्रा चार दिवसांची असून पहिल्या दिवशी कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे दर्शन नागरिकांना मिळणार असून त्याच दिवशी तुळजापूर येथील तुळजा भवानीचे दर्शन व रात्रीचा मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी माहूरला रेणूका माता दर्शन होईल. याच ठिकाणी दुसरा मुक्‍काम होईल. तिसऱ्या दिवशी वणी येथील येथील चतु:श्रुंगी देवीचे दर्शन होईल. १२ ऑक्‍टोबर रोजी रात्री दहा बस पुन्हा आगारात येतील. ‘‘ऑनलाईन बुकींग’ ची सोय उपलब्ध असून एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावरुन ‘बुकींग’ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या गाड्यांची ‘बुकींग’ सुरु झाली असून आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आगार प्रशासनाकडून सांगण्यात आले. १० वर्षा आतील मुलांना , तसेच ६५वर्षे पुढील ज्येष्ठ नागरिकांना मंदिर प्रवेश नाही याची नोंद घ्यावी. तसेच वरील भाडे हे फक्त प्रवासभाडे आहे. या प्रवासामध्ये होणार इतर खर्च हा प्रवाशांना वैयक्तिक करावा लागेल. दरम्यान, गतवर्षी वल्लभनगर आगारातून साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ३ विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यामाध्यमातून एस. टी. ला सव्वा दोन लाखांचे उत्पादन मिळाले होते.

असे आहे प्रवासी भाडे

  1. प्रौढ व्यक्‍ती - 2295 रुपये

  2. लहान मुले - 1150 रुपये

  3. अपंग व्यक्‍ती - संधी नाही

  4. ज्येष्ठ नागरिक - संधी नाही

अशी करावी नोंदणी

अधिक माहिती साठी आर.टी. जाधव. यांच्या खालील ९८५०९१२४१५ क्रमांकावर संपर्क साधावा. कोविड च्या अनुषंगाने राज्यशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे प्रवाशांना गरजेचे राहील. हे जाहीर असावे. या बस ही आरक्षणासाठी उपलब्ध असून s.t. च्या संकेतस्थळावर आपण आपले सिट आरक्षित करू शकता. आरक्षण हे चिंचवड ते साडेतीन शक्तिपीठ दर्शन असे टाकण्यात यावे. त्यासाठी -cnwd to sddttnकोड आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT