Shrirang Barne
Shrirang Barne Sakal media
पिंपरी-चिंचवड

सध्या दुसरे घर काळाची गरज - खासदार श्रीरंग बारणे

सकाळ वृत्तसेवा

कोरोना काळात आपण पाहिले की एक घर असेल तर; कशा अडचणी होतात. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये सध्या दुसरे घर ही काळाची गरज झाली आहे.

पिंपरी - कोरोना काळात आपण पाहिले की एक घर असेल तर; कशा अडचणी होतात. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये सध्या दुसरे घर ही काळाची गरज झाली आहे. आता बाजारपेठेत चांगले दिवस असल्याने बांधकाम व्यावसायिकांनाही संधी आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी शनिवारी (ता. १) चिंचवड येथे व्यक्त केले.

‘सकाळ’ माध्यम समूहाच्यावतीने ॲाटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे आयाोजित ‘सकाळ वास्तू एक्स्पो’चे उद्घाटन खासदार बारणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी निर्माण ग्रीन्स ग्रुपचे भूषण आगरवाल, तनय गुप्ता, सिटीवन ग्रुपचे सचिन आगरवाल, ग्रो मोअर ग्रुपचे मितेश मित्तल, भगवती ग्रुपचे बाळासाहेब औटी, विस्टेरिया प्रॉपर्टीजचे ऋषभ जैन, शिंदे-मासुळकर कंन्स्ट्रक्शन्सचे विशाल मासुळकर, ए. व्ही. कार्पोरेशनचे सागर मारणे, मंत्रा वास्तूचे दिनेश जहागीरदार, श्रध्दा जहागीरदार, ऐश्‍वर्यम ग्रुपचे नरेंद्र आगरवाल, साई आंगणचे मारुती शिंदे, बांधकाम व्यावसायिक रवी नामदे, सकाळ जाहिरात विभागाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर नवल तोष्णीवाल, पुणे जाहिरात विभागाचे सरव्यवस्थापक रूपेश मुतालिक, उपसरव्यवस्थापक मिलिंद भुजबळ, सहयोगी संपादक जयंत जाधव, वरिष्ठ बातमीदार पितांबर लोहार आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड शहर जसे वाढत आहे, तसे नागरिकांना राहण्या योग्य घरांची गरजही वाढत आहे. नागरिकांना पूर्वी जादा घरे उपलब्ध नसल्याने बांधकाम व्यावसायिकांकडे जी असेल ती घरे घ्यावी लागत होती. परंतु; आता स्पर्धा असल्याने बांधकाम व्यावसायिकांना आता दर्जेदार, अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेली घरे देणे आवश्‍यक झाले आहे.’

‘सकाळ वास्तू एक्स्पो’मध्ये ३० बांधकाम व्यावसायिक व १५० पेक्षा अधिक प्रकल्प एकाच छताखाली पाण्यासाठी नागरिकांना मोफत उपलब्ध आहेत. वाकड, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावेत, मामुर्डीपर्यंत आणि उत्तरेकडील चिखली, तळवडे, डुडुळगावपासून दक्षिणेकडील सांगवी, नवी सांगवी, दापोडीपर्यंत व त्या लगतच्या सर्व भागातील गृहप्रकल्पांची माहिती ‘सकाळ वास्तू एक्स्पो’मध्ये मिळणार आहे. आपल्या मनातील घर कसे असावे, त्याचे बजेट किती असेल याबाबत बांधकाम व्यावसायिक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी समोरासमोर चर्चा करता येणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या मुहूर्तावर घर घेण्याची संधी आहे. अगोदरचे घर असेल तर; भविष्यातील गुंतवणूक म्हणूनही घरांकडे पाहण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे रविवारी ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला भेट देण्यासाठी वेळ राखीव ठेवा व घर बुकिंग करण्याची संधी साधा.

कधी?, कुठे?, केव्हा?

कधी : २ ऑक्टोंबर २०२२

कुठे : ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड.

केव्हा : सकाळी ११ ते रात्री ८

संपर्क : ९८८१७१८८४०

मार्गदर्शनपर व्याख्यान

विषय : फ्लॅटचे वास्तुशास्त्र

वक्ते : आनंद पिंपळकर (प्रसिद्ध वास्तूतज्ज्ञ)

कधी : रविवार, ता. २ ऑक्टोंबर

वेळ : दुपारी ४.०० वाजता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Meta AI : व्हॉट्सअ‍ॅपवर कसं वापरायचं 'मेटा एआय'? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT