sanjay raut over pm modi to win mumbai municipal corporation politics marathi news
sanjay raut over pm modi to win mumbai municipal corporation politics marathi news Sakal
पिंपरी-चिंचवड

Sanjay Raut : मोदींनी मुंबई महापालिका जिंकून दाखवावी - संजय राऊत

प्रफुल्ल भंडारी

दौंड : भारतीय जनता पक्षाकडे जिंकण्याचे मनोबल असेल तर त्यांनी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील अन्य महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका घेतल्या पाहिजेत. परंतु त्यांच्यामध्ये ते साहस नाही.

देशाचे पंतप्रधान व भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबईत येऊन प्रचार करावा आणि महिनाभर थांबून निवडणूक जिंकून दाखवावी, असे थेट आव्हान शिवसेनेचे (ठाकरे गट) राज्यसभेतील वरिष्ठ खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.

दौंड शहरात पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी ही आव्हान दिले. पुणे जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष नामदेव ताकवणे, शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते, जिल्हाप्रमुख शरद सूर्यवंशी, उप जिल्हाप्रमुख अनिल सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, आदी या वेळी उपस्थित होते.

खासदार राऊत म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वेगळा निकाल लागणार आहे. लोकांमध्ये भाजपविषयी नाराजी आहे आणि सत्तेसाठी सुरू असलेल्या कुरघोड्यांमुळे मनात अस्वस्थता आहे. महाराष्ट्रातील अकरा कोटी जनता आपले नेतृत्व गुजरात कडे देणार नाही. मराठी माणूस षंढ झालेला नाही आणि मराठी झेंडाच फडकेल. राजकीयदृष्ट्या मर्द असाल तर सत्ताधारींनी निवडणुका घेत जनतेला सामोरे जायले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटी रूपयांच्या सिंचन घोटाळ्याचा जाहीररित्या आरोप केला परंतु त्यानंतर लगेचच त्यांना सत्तेत सहभागी करून उपमुख्यमंत्री करण्यात आले. सत्तेविरूध्द बोलणारे आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांना अटक करण्यात आली पण आम्ही चळवळीतून पुढे आलो असल्याने शरण जाणार नाही. संजय सिंग यांची अटक राजकीय आहे.

भ्रष्ट आणि ओवाळून टाकलेल्या नेत्यांना भाजपने आपल्याकडे घेतले आहे परंतु सत्तेत परिवर्तन अटळ आहे. २०२४ मध्ये दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यातील पाचशे कोटी रूपयांच्या मनी लॅांड्रिंग प्रकरणी दौंडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल हे देखील जेल मध्ये असू शकतात, अशी शक्यता संजय राऊत यांनी या वेळी व्यक्त केली.

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपकडे उमेदवार नाही त्यामुळे ते नेहमीप्रमाणे उमेदवार आयात करतील किंवा लादतील. बारामती मध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार देतील तोच उमेदवार निवडून येईल. त्या उमेदवारास मोठ्या फरकाने निवडून आणण्याची आमची पण जबाबदारी आहे, असे संजय राऊत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT