Sewage Plant Dapodi Sakal
पिंपरी-चिंचवड

दापोडीतील मैलाशुद्धीकरण प्लॅन्ट बंद; नदी प्रदूषणासह डास किटकांचा उपद्रव वाढला

दापोडी येथील महापालिकेचा पवना नदी किनारा भागातील मैलाशुद्धीकरण प्लॅंट गेली काही दिवसांपासून बंद आहे.

रमेश मोरे

दापोडी येथील महापालिकेचा पवना नदी किनारा भागातील मैलाशुद्धीकरण प्लॅंट गेली काही दिवसांपासून बंद आहे.

जुनी सांगवी - दापोडी येथील महापालिकेचा पवना नदी किनारा भागातील मैलाशुद्धीकरण प्लॅंट गेली काही दिवसांपासून बंद आहे. याचबरोबर तुटलेले चेंबर यामुधून होणारी गळती यामुळे पवना नदीपात्रात मैलामिश्रित पाणी जात असल्याने दुर्गंधीसह नदीप्रदुषणात भर पडत आहे. गेली आठवडाभर मोठा पाऊस व नदीला असलेले प्रवाही पाणी यामुळे नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. मात्र, पावसाच्या उघडीपीनंतर येथील चेंबर मधून होणारी गळती, बंद असलेल्या मैलाशुद्धीकरण प्रक्रिया यामुळे नदी किनारा भागातील रहिवाशी नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. गेली अनेक दिवसांपासून येथील दुरुस्तीचे कामे संथ गतीने सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दापोडी प्लॅंटच्या बाजूला अंदाजे साठ फुट लांब तर चाळीस फूट खोल खोदकाम करण्यात आलेले आहे. या भागात घाण पाणी साचून राहत आहे. या खोदकामामुळेच येथील ट्रान्सफॉर्मर खचला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. येथील दुरूस्तीचे काम सुरू असून तात्काळ येथील दुरूस्त्या करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत मनसेचे राजु सावळे यांनी पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे सांगवी दापोडी येथील बंद असलेला मैलाशुद्धीकरण प्लॅन्ट, तुटलेले चेंबर त्यातून होणारी गळतीची दुरुस्ती करण्याबाबत नागरिकांच्या वतीने मागणी केली आहे.

प्रकल्प बंद असल्याने दुर्गंधीचा व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.

- करण पिल्ले, रहिवाशी

गेली पंधरा दिवसांपासून हा प्लॅंट बंद आहे.पवनातील पाणी ओसरल्यावर ही गोष्ट प्रशासनाच्या लक्षात आली आहे.

- रमण नायर, नागरिक

येथील ट्रान्सफॉर्मर खचला होता. येथील काम तातडीने सुरू आहे. त्यापुर्वी येथील प्लॅंट बंद राहिल्याने सांगवी प्लॅंटमधून प्रक्रिया सुरू होती.

- संजय कुलकर्णी, मुख्य समन्वय अधिकारी 'ह' क्षेत्रिय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

SCROLL FOR NEXT