shinde fadnvis govt mahesh landge Property Card Pimpri-Chinchwad  sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’चा विषय लागणार मार्गी; महेश लांडगे

अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’ चा विषय आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी याबाबत लक्षवेधी मांडली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मध्ये करण्यात आले आहे. मात्र, प्राधिकरणाच्या सुमारे ३० हजार भूखंडाचे प्रॉपर्टी कार्ड बनवण्याचे काम प्रलंबित आहे.

२०१८ मध्ये सेक्टर २ मधील मिळकतधारकांना प्रायोगिक तत्वावर प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरच्या काळात हे काम प्रशासकीय अनास्थेमुळे तसेच दप्तर दिरंगाईमुळे जैसे थे आहे. प्राधिकरण हद्दीचे नकाशे तयार नाहीत. त्यामुळे प्राधिकरणाची हद्द नेमकी काय आहेत? याबाबतही संभ्रम आहे.

जागामालकांचे सातबारे किंवा खरेदीखतावर केवळ ‘प्राधिकरण संपादित’ असा उल्लेख आढळतो. परिणामी, प्राधिकरणच्या जागेत अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेत याबाबत कोणताही लेखाजोखा नाही.

याचा परिणाम महसुली उत्पन्नावर होतो. तसेच, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचेकडील दि. २२ मार्च १९७६ च्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १२२ च्या अधिसूचनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिका समाविष्ट गावांची नगर भूमापन करण्याची अधिसूचना मंजूर होवून नगर भूमापानाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता.

मूळ नगर भूमापनासाठी सविस्तर मोजणी व हक्क चौकशी कामकाज सन १९७६ ते १९८० च्या दरम्यान करण्यात येवून त्याप्रमाणे नकाशा व मिळकत प्रत्रिका तयार करण्यात आल्या आहेत, असे आमदार लांडगे यांनी लक्षवेधी म्हटले आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने प्राधिकरणाचे ‘पीएमआरडीए’त विलीनीकरण केले. त्यावेळी सुमारे १ लाख नागरिकांशी संबंधित आणि ४५ ते ५० हजार जागा मालकांच्या ‘प्रॉपर्टी कार्ड’चा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात याकडे दुर्लक्ष झाले.

शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून महापालिका, पीएमआरडीए आणि भूमि अभिलेख विभागाच्या एकत्रित सहयोगातून ‘प्रॉपर्टी कार्ड’ चा विषय मार्गी लावण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली असून, सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

- महेश लांडगे, आमदार तथा शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी चिंचवड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A : गौतम गंभीर आता काय करणार? इंग्लंड दौऱ्यावर ज्यांना नव्हती दिली संधी, त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार खेळी...

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

खरंच जया यांच्यासोबत बिनसल्यामुळे ऐश्वर्या राय वेगळी राहात होती? लोकप्रिय दिग्दर्शक म्हणाले- ती आईच्या घरी जायची पण...

Smriti Mandhana चे ऑस्ट्रेलियाविरुद्ध घोंगावलं वादळ! शतक ठोकत केला मोठा पराक्रम; हरमनप्रीत-मिताली राहिल्यात खूप मागे

Nashik News : 'सेवा पंधरवडा' सुरू: नाशिक विभागात 'पाणंद रस्ते' आणि 'सर्वांसाठी घरे' उपक्रमाला गती!

SCROLL FOR NEXT