shivsena sakal
पिंपरी-चिंचवड

शिवसेनेचा महापालिकेत ‘आव्वाज’

स्थायी समिती बरखास्तीची मागणी; जोरदार घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘चोर भाजप, दरोडेखोर भाजप’, ‘लूटमार नही चलेगी, नही चलेगी’, ‘बरखास्त करा, बरखास्त करा, महापालिका स्थायी समिती बरखास्त करा’, ‘भ्रष्ट भाजपचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’, ‘करदात्या नागरिकांच्या पैशावर दरोडा टाकणाऱ्या भाजप नगरसेवकांचा धिक्कार असो’, ‘पैसे नागरिकांच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’... अशा घोषणा देत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. २०) महापालिका परिसर दणाणून सोडला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी स्थायी समिती कक्षात छापा टाकला. यात ठेकेदाराकडून लाच घेताना समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांचा स्वीय सहाय्यक ज्ञानेश्‍वर पिंगळे याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर लांडगे व पिंगळे यांच्यासह पाच जणांना अटक केली. या लाच प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेनेने महापालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. खासदार श्रीरंग बारणे, महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख नगरसेवक सचिन भोसले, उपजिल्हा प्रमुख नीलेश मुटके, सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, अनंत कोऱ्हाळे, धनंजय आल्हाट, मधुकर बाबर, सचिन सानप, सरिता साने, अनिता तुतारे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. महापालिकेची सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता होती. त्यासाठी येणाऱ्या एकेका भाजप नगरसेवकाकडे पाहत आंदोलक आणखी आक्रमक होवून घोषणाबाजी करत होते.

आंदोलनानंतर खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचारात लक्ष घालावे, भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी, अशा मागण्या केल्या. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले. लाच प्रकरण हे शहरासाठी अतिशय निंदनीय घटना आहे. भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचारी पार्टी आहे. गेल्या चार वर्षांपासून त्यांनी लूट चालवली आहे. त्यांच्यावर कारवाई झाली आहे. स्थायी समिती बरखास्त करून नवीन सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले यांनी केली. योगेश बाबर यांनीही भाजपच्या साडेचार वर्षातील कारभाराच्या चौकशीची मागणी केली.

भाजपने जनतेचा विश्‍वासघात केला : बारणे

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या सत्तातूर टोळीमुळे भाजप बदनाम झाले आहे. भ्रष्टाचार करून तुंबड्या भरणे, हा एकमेव कार्यक्रम राबविणाऱ्या टोळीने नाकीनऊ आणले आहे. महापालिकेला भ्रष्टाचाराच्या खाईत लोटले आहे. जनतेचा विश्‍वासघात केला आहे, असा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. ते म्हणाले, ‘‘लुटारुंच्या टोळीने कोरोना काळातही भ्रष्टाचार करणे सोडलेले नाही. मागील साडेचार वर्षात भाजपने भ्रष्टाचाराचा कळस केला. यामुळे भाजपचे मूळ व जुने कार्यकर्ते, नेत्यांना वेदना होत असतील, मात्र ते हतबल आहेत. लाचप्रकरणी लोकप्रतिनिधीला अटक केली. महापालिकेत राजरोसपणे चाललेल्या भ्रष्टाचाराचा हा मोठा पुरावा आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Protest : आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले- संवादाचा अभाव कोणाच्याही हिताचा नाही

Navi Mumbai Municipal Schemes: प्रशिक्षणानंतर थेट नोकरी देण्याचा प्रयत्न, नवी मुंबई पालिकेचा विविध योजनांचा धमाका

Live Updates Marathi : भाजप सरकार गोरगरिबांवर लाठ्या चालवतं; मनोज जरांगेंनी जंतर मंतरवर व्यक्त केला संताप

ITR Deadline: सर्वांसाठी 31 जुलैची तारीख नाही! शेअर बाजारातील एक ट्रेड केला तरी बदलू शकते ITR डेडलाइन; पाहा नियम

माझ्याजवळ येऊन झोप...! नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT