pcmc sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा

महापालिका स्थायी समिती अध्यक्षांच्य स्वीय सहायक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी छापा टाकला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षांच्य स्वीय सहायक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी छापा टाकला. स्वीय सहायकाची चौकशी सुरू आहे. स्थायी समिती अध्यक्ष कार्यालयातून निघून गेले आहेत. महापौर उषा ढोरे यांनी बोलण्यास नकार दिला. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची बुधवारी दुपारी दोन वाजता साप्ताहिक बैठक ऑनलाइन झाली. बैठकीत ३० विषय मान्यतेसाठी होते. ऐनवेळचेही काही विषय होते ‌. सात विषय तहकूब करण्यात आले. (PCMC News)

सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समिती स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांना महापालिका आवारात ठेकेदाराकडून पैसे घेताना पकडले. त्यानंतर पिंगळे यांना तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्या कक्षात आणले. त्यांच्यासह चार जणांची चौकशी सुरू आहे. महापालिका भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व विरोधी पक्षनेते यांची दालने व त्यांच्या स्वीय सहायकांचे कक्ष आहेत. मात्र, त्यांनी किती रक्कम स्विकारली याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र, दोन लाख रुपये घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, महापालिका भवनात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT