crime.j 
पिंपरी-चिंचवड

मेहुण्याच्या लग्नासाठी कायपण; पोलिस स्टेशनमधून आरोपीनं ठोकली धूम

सकाळन्यूजनेटवर्क

पिंपरी- अवैधरित्या गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाने एकावर कारवाई करून आरोपीला शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. लघुशंका करण्याच्या बहाण्याने गेलेला हा आरोपी  चौकीच्या खिडकीतून उडी घेऊन पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी बारा तासात त्याचा शोध घेऊन त्याला भिवंडी येथून अटक केली. दरम्यान, मेहुण्याच्या लग्नासाठी उपस्थित राहायचे असल्याने आपण पळून गेलो असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. करम होशियतअली शेख (वय २९, रा. कामन रोड, भिवंडी, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. मुंबई येथून हडपसर येथे एका छोट्या टेम्पोतून प्रतिबंधित गुटखा आणला जाणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी (ता.३०) पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाटा सबवे जवळ सापळा लावून टेम्पो ताब्यात घेतला.  त्यातून बारा लाख ३० हजार ५६० रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. तसेच रोख रक्कम, मोबाईल फोन व टेम्पो असा एकूण वीस लाख ५४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत  पोलिसांनी जप्त केला.

याबाबत शिरगाव चौकीत गुन्हा दाखल करून सामाजिक सुरक्षा विभागाने आरोपी करम शेख व त्याच्या साथीदाराला शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस चौकीत असताना करम याने लघुशंकेचा बहाणा करून चौकीच्या खिडकीतून बुधवारी (ता. ३१) रात्री पलायन केले.  पोलिसांनी अंधारात त्याचा पाठलाग केला. मात्र, तो हाती लागला नाही.  अखेर गुरुवारी (ता.१) सकाळी नऊच्या सुमारास त्याला भिवंडी येथून पुन्हा ताब्यात घेतले. दरम्यान, करम याच्या मेहुण्याचे लग्न असल्याने चौकीतून पळून गेला असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. शिरगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT