पिंपरी-चिंचवड

पिंपरी : परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा निर्णय.

आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

‘मी जबाबदार’ या अधिकृत ॲपद्वारे १ जूनपासून नोंदणी करता येणार असल्याने परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाट मोकळी झाली आहे.

पिंपरी : ‘परदेशी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना हवाय डोस’ हे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत आयुक्त राजेश पाटील यांनी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरणाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांना ‘मी जबाबदार’ या अधिकृत ॲपद्वारे १ जूनपासून नोंदणी करता येणार असल्याने परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाट मोकळी झाली आहे. (special vaccination campaign for students)

शहरातून दरवर्षी हजारो विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जातात. यंदाही अनेकांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. पण, त्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले नसल्याने परदेशात जाताना अडथळा येऊ शकतो. तसेच सध्या १८ ते ४४ वयोगटातील महापालिकेचे लसीकरण बंद आहे, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी लसीकरणासंदर्भात महापालिकेकडे मागणी केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिकेने नियोजन केले असून यासाठी ‘मी जबाबदार’ या अधिकृत ॲपद्वारे १ जूनपासून नोंदणी करता येणार आहे. कोरोना रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम जलदगतीने राबविण्यासाठी महापालिकेच्यावतीने नवीन ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु होणार आहे.

ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र लोकांना वाहनांमधून बाहेर न जाता लस शॉट घेण्याची परवानगी देण्यात येईल. यात शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी तसेच एक वर्षापेक्षा लहान बाळ असणाऱ्या स्तनदा मातांसाठी नवे लसीकरण केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. आजारामुळे अंथरुणावर असलेले रुग्ण तसेच गतिमंद व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT