पिंपरी - लॉकडाउनमुळे पिंपरी चिंचवडमध्ये अडकलेल्या व्यक्तींना मूळगावी जाण्यासाठी चिंचवड स्टेशन येथील पोलिस उपायुक्त कार्यालयातून प्रवास पास दिले जाणार आहेत. मात्र, कंन्टेटमेंट झोनमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना हे पास दिले जाणार नसल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लॉकडाउनमुळे परराज्यातील व महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील अनेकजण पिंपरी चिंचवड शहरात अडकून पडले आहेत. यामध्ये मजूर, भाविक, विद्यार्थी व पर्यटकांचा समावेश आहे. अशा व्यक्तींना त्यांच्या मूळगावी पाठविण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून परराज्यात जावू इच्छिणाऱ्या मजूर, भाविक, विद्यार्थी व पर्यटक यांच्या गटाने ते वास्तव्यास असलेल्या पोलिस ठाण्याकडील अर्ज भरून द्यायचा आहे. त्यासोबत प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी झाल्याबाबतचे नोंदणीकृत वैद्यकीय चिकित्सक यांचे प्रमाणपत्र जोडायचे आहे.
त्यानंतर या अर्जातील सविस्तर माहिती पुणे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संबधीत राज्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविली जाईल. त्यांची मंजुरी आल्यानंतरच परिमंडळचे पोलिस उपायुक्त त्या व्यक्तीच्या गटास शासनाने निश्चित केलेल्या अटी शर्तीनुसार प्रवास पास देतील. हे पास पिंपरी, चिंचवड , निगडी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, दिघी, आळंदी, चाकण या पोलीस ठाण्यातर्गत असलेल्या व्यक्तींना चिंचवड स्टेशन येथील परिमंडळ 1 कार्यालयात तर वाकड हिंजवडी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, सांगवी, चिखली या पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या व्यक्तींना परिमंडळ 2 कार्यालयात उपलब्ध होतील.
दरम्यान, पाचपेक्षा कमी व्यक्तींना परराज्यात प्रवास करायचा असेल अथवा महाराष्ट्रात जिल्हातर्गत तातडीच्या कारणास्तव प्रवास करायचा असल्यास covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. सोबत ना हरकत वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने घोषित करण्यात आलेल्या कंन्टेटमेंट झोनमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या प्रवासाचे पास दिले जाणार नसल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.