sushil kumar shinde sakal media
पिंपरी-चिंचवड

मागासवर्गीयांनी शिक्षण घेऊन पुढे जावे-सुशीलकुमार शिंदे

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘‘जात-धर्म (cast-religion) आपल्या पाचवीला पुजले आहे. त्याचे भांडवल (politics) कुठपर्यंत करायचे. माणसाने जिद्द (ambition) बाळगली पाहिजे, तरच बदल घडू शकतो. त्यामुळे मागासवर्गीयांतील (backward class people) छोट्या-छोट्या जातींनी समर्थपणे उभे राहणे गरजेचे आहे. मागासवर्गीयांनी शिक्षण (education) घेऊन समाजाची प्रगती साधली पाहिजे,’’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (sushilkumar shinde) यांनी केले.

काळेवाडी येथे ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील होते. मातंग साहित्य परिषद, महाराष्ट्र संस्थेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी या निमित्ताने सोहळ्याचे आयोजन केले होते.

यावेळी अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागाचे माजी प्रमुख प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर यांना ‘समाजमित्र’, मातंग समाजाचे अभ्यासक डॉ.अंबादास सगट (औरंगाबाद) यांना ‘समाजरत्न’, मराठी भाषेचे आणि साहित्याचे अभ्यासक डॉ. राजाभाऊ भैलुमे (शिरूर) आणि डॉ.बाबासाहेब शेंडगे (कोपरगाव) यांना ‘समाजबंधू’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. प्रिया गोरखे आणि जालिंदर कांबळे यांचा विशेष सन्मान केला.

डॉ. सबनीस म्हणाले, तालिबान प्रश्‍न, उत्तर कोरिया-दक्षिण कोरिया संघर्ष, इराण-अमेरिका किंवा चीन-अमेरिका या महासत्तामधील सत्तासंघर्षामध्ये तिसरे महायुद्ध कधी होऊन शकते. जगातील अशा हिंस्र प्रवृत्तीचे राष्ट्रप्रमुख बेईमान आहेत. जी बेरीज अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांत होती, तीच विश्वएकात्मता अंगीकारणे गरजेचे आहे. म्हणूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची बेरीजच मी कायम करत आलो आहे.’’

यावेळी ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र आणि चिंतन’, ‘मातंग आणि सांस्कृतिक राष्ट्रसंघ भारत’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळ उद्योजक सचिन ईटकर, साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष राजन लाखे , दलित स्वयंसेवक संघाचे माजी प्रमुख दादासाहेब सोनवणे आदी उपस्थित होते. मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे यांनी प्रास्ताविक केले. शंकर तडाखे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI Credit Card: SBI क्रेडिट कार्ड वापरताय? 1 तारखेपासून नियम बदलणार; कोणते फायदे मिळणार नाहीत?

Latest Marathi News Updates: फडणवीस वाकड्यात घुसतात, म्हणून मी असं बोलतो – मनोज जरांगे

Hartalika Vrat 2025 Puja Samagri: अखंड सौभाग्यासाठी हरतालिका व्रत; पूजेसाठी लागणारे साहित्य व विधीची संपूर्ण माहिती वाचा एकाच क्लिकवर!

Dada Bhuse : महायुतीचा निर्णय शिंदे घेतील; पण आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा: दादा भुसे

Pune Airport : विमानाच्या खिडकीचे आतील आवरण निघाले; पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानातील घटना

SCROLL FOR NEXT