police sakal
पिंपरी-चिंचवड

पोलिस भरतीच्या उमेदवारांपुढे तांत्रिक अडचण

खूप दिवस मेल आयडी सुरू नसल्याने बंद पडल तर काहीचे गहाळ

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : अनेक वर्षांपासून मेहनत घेऊन भरतीची वाट पहिली. सराव सुरूच ठेवला. भरती प्रक्रिया राबवायला सुरुवात झाल्याने आशा पल्लवित झाल्या. अर्ज भरल्यानंतर जोरदार तयारी करण्यासह कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असतानाच भावी पोलिसांपुढे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. अर्ज भरल्यानंतर आता पुढील प्रक्रियेसाठी भरतीच्या अर्जावर नमूद केलेलाच ई मेल आयडी आवश्यक असून त्यावरच पुढील माहिती पाठवली जाणार आहे. मात्र, खूप दिवस मेल आयडी सुरू नसल्याने काहींचे मेल आयडी बंद पडले असून, काहींचे आयडी विसरून गेले आहेत. यामुळे अशा उमेदवारांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.

पोलिस दलात भरती होण्यासाठी तरुण कठोर मेहनत घेतात. तासनतास सराव करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी दिवसरात्र एक करतात. मात्र, अनेक दिवसांपासून भरतीच नसल्याने या तरुणांमध्ये निराशा होती. मात्र, तीन वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी ७२० जागांसाठी एक लाख ८९ हजार ७३२ जणांचे अर्ज आले आहेत.

दरम्यान, अर्ज भरून तब्बल दोन वर्षे उलटल्याने मेल आयडीचा वापर न झाल्याने अर्जावर टाकलेले काही उमेदवारांचे ई मेल आयडी बंद पडले आहेत. तर काही जणांचे आयडी गहाळ झाले. अशातच आता अर्जाचा आयडी, पासवर्ड यासह महत्त्वाची माहिती मेल आयडीवरच उमेदवाराला पाठवली जाणार आहे. त्यानुसार सर्व माहिती पुन्हा उमेदवाराने ठराविक मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज बाद होण्याची भीती आहे. त्यामुळे मेल आयडी व्यतिरिक्त अन्य पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.

- हे करा

अर्जावर टाकलेली सर्व माहिती आपल्याकडे जतन करून ठेवायला हवी. आयडी, पासवर्ड एखाद्या डायरीत नमूद करून ठेवावेत. मेल आयडी इतर यंत्रणा सतत वापरत रहायला हवी. आपल्याकडील माहिती, कागदपत्रे अपडेट ठेवायला हवीत. आपले मेल आयडीसह इतर पासवर्ड सार्वजनिक न करता गोपनीय ठेवावेत.

पोलिस भरतीची अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो. अखेर सप्टेंबर २०१९ ला भरती निघाली. यासाठी अर्ज भरून ई मेल आयडी टाकला. मात्र, तो मेल आयडी आता बंद पडला आहे. अशातच आता अर्जाचा आयडी, पासवर्ड व इतर माहिती त्याच मेल आयडीवर पाठवली जाणार आहे. पुढील माहिती मर्यादित कालावधीतच पाठवणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज बाद ठरवले जाण्याची भीती आहे. यासाठी इतर पर्याय उपलब्ध करून द्यावा.

- उदय बारामतीकर, पोलिस भरतीसाठी अर्ज केलेला तरुण

अशा प्रकारच्या काही तक्रारी आल्या असून अर्जावर नमूद केलेला मेल आयडी पुढील प्रक्रियेसाठी महत्त्वाचा ठरतो. हा मेल आयडी बंद पडल्यास केवळ एकदाच रिसेट करावा. वारंवार रिसेट केल्यास अधिक अडचण वाढते. मेल आयडी सुरू होत नसल्यास आयुक्तालयातील सायबर सेलशी संपर्क साधावा. येथेही समस्या न सुटल्यास संबंधित उमेदवाराने तातडीने वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून अर्जासह आपली मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे.’’

- संजय तुंगार, पोलिस निरीक्षक, सायबर सेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT