पिंपरी : कोरोना संसर्गाचा प्रादर्भाव पिंपरी-चिंचवड शहरात वाढत आहे. पहिला रुग्ण अकरा मार्चला आढळला. या घटनेला कालच पन्नास दिवस पूर्ण झालीत. गेल्या 51 दिवसात सुमारे दोन हजार आठशे व्यक्ती तपासल्या. घरोघरी जाऊन पंधरा हजारावर व्यक्तींशी संपर्क साधला. पाच हजारांवर व्यक्तींना क्वारंनटाइन केले. जवळपास १२० व्यक्तींना संसर्ग झाल्याचे आढळून आले. यातील 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र, त्यांचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडील (एनआयव्ही) रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यावर वायसीएम व भोसरीतील रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
आजपर्यंत ४३ जण बरे होऊन घरी गेले आहेत. पण, सुरुवातीला कमी असलेला रुग्ण वाढीचा वेग गेल्या आठ दिवसांत वाढला असल्याचे वैद्यकीय विभागाकडील आकडेवारी वरून दिसते. आजपर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन जण पुण्यातील आहेत. सध्या शहरात पुणे शहर व जिल्ह्यातील दहा जणांवर, तर शहरातील नऊ जणांवर पुण्यात उपचार सुरू आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारने लॉकडाउन जाहीर केले आहे. तीन मे पर्यंत लॉकडाउनची मुदत आहे. दरम्यान, महापालिका आयुक्तांनी एकोणीस एप्रिलपासून संपूर्ण शहर सील केले होते. सत्तावीस एप्रिल रोजी त्यात शिथिलता आणली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपूर्ण शहराऐवजी प्रादुर्भाव असलेले १९, ठिकाणेच सील ठेवली. त्याची मुदतही तीन मे रोजी संपत आहे. त्यानंतर आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे. निर्बंध शिथिल करताना, आयुक्त म्हटले होते की, शहरात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढीची गती कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संपुर्ण शहर कंटेनमेंट झोन (प्रतिबंधिक विभाग) घोषित करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शहरातील निर्बंध काही प्रमाणात कमी करून केवळ रुग्ण आढळलेल्या ठिकाणचा परिसर 'कंटेनमेंट झोन' सोमवार (ता. 27) मध्यरात्रीपासून प्घोषित केला. कंटेनमेंट परिसराच्या सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद आहेत. नागरिकांना घराबाहेर पडण्यासही बंदी आहे. तीन मेपासून या परिस्थितीत बदल होणार की निर्बंध कायम राहणार याकडे लक्ष लागले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कंटेनमेंट झोन
- खराळवाडी पिंपरी जामा मशिद ते गिरमे हाॅस्पिटल.
- पीएमटी चौक भोसरी परिसर
- गुरुदत्त कॉलनी भोसरी परिसर
- शास्त्री चौक परिसर भोसरी
- रामराज्य प्लॅनेट परिसर कासारवाडी
- गणेशनगर परिसर दापोडी
- संभाजीनगर कस्तुरी मार्केट परिसर
- रोडे हॉस्पिटल परिसर दिघी
- तनिष्क आर्किड सोसायटी परिसर चऱ्होली
- कृष्णराज कॉलनी परिसर पिंपळेगुरव
- नेहरुनगर बस डेपो नुरानी मशीद परिसर
- कावेरीनगर पोलिस वसाहत परिसर वाकड
- रुपीनगर परिसर तळवडे
- फातीमा मशिद गंधर्वनगरी परिसर मोशी
- विजयनगर परिसर दिघी
- आदिनाथनगर परिसर भोसरी
- पिंपरी गाव तपोवन मंदिर परिसर
- पिंपळे गुरव सोळा फुटी रस्ता, गावठाण परिसर
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नागरिकांच्या सोयीसाठी
पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) पूर्णपणे कोरोना संसर्गजन्य आजाराचे संशयित व बाधित रुग्णांना समर्पित आहे. रुग्णालयात फिव्हर क्लिनिक व नातेवाईकांकरिता समुपदेशन केंद्र सुरू केले आहे.
रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाचे संपूर्ण उपचार हे मोफत करण्यात येत असून, आवश्यक चाचण्या व उपचार शुल्क रुग्णांचे नातेवाईकांकडून कोणत्याही स्वरूपात आकारले जात नाही. या शिवाय उपचार कालावधी दरम्यान रुग्णाला नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण मोफत पुरविण्यात येत आहे. कोरोना व्यतिरिक्त अन्य आजार असल्यास सदर व्यक्ती अथवा नातेवाईक यांनी वायसीएममधील आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून संदर्भ सेवा पत्र घेऊन पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात द्यायचे. त्यांनंतर त्यांना वैद्यकीय सेवा मिळवता येईल.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी उपचारासाठी येताना आधार कार्ड व रहिवासी असल्याचा पुरावा हा मोबाइलमध्ये फोटो काडून दाखल होताना नोंदणी कक्षात सादर केल्यास नोंदणी प्रक्रिया सुलभ होईल. तसेच पूर्वीचे काही गंभीर आजार असल्यास त्या बाबतची कागदपत्रे व औषधे सोबत ठेवावी. यामुळे रुग्णाचे उपचार योग्य दिशेने करणे सुलभ होणार आहे.
सदर रुग्णांना शासनाच्या विविध योजना उदा. महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी आपले पिवळे, केशरी शिधा पत्रिका, आधार कार्ड, इत्यादी ओळख पत्र आणावे जेणे करून त्यांना इतर रुग्णालयात सुविधांचा लाभ घेता येईल. असे आवाहन वायसीएमचे अधिष्टता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.