पिंपरी-चिंचवड

हातातील कोयते भिरकावून माजविली दहशत; ताथवडेतील प्रकार 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मोठमोठ्याने आरडाओरडा करीत कोयते हवेत भिरकावून परिसरात दहशत माजविली. त्यानंतर एकमेकांना जिवे मारण्याच्या धमक्‍या दिल्याप्रकरणी दोन गटातील सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ताथवडे येथे घडली. 

योगेश चंद्रकांत पवार (वय 20), सूरज बापू गायकवाड (वय 20), रविराज राजेंद्र केदार (वय 21), गौरव कुडाळे, रणव रेरा (सर्व रा. रा. अशोकनगर, ताथवडे), साहिल कुंभार (रा. दळवीनगर, आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शनिवारी (ता. 11) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अशोकनगर येथे आरोपी योगेश पवार व त्याचे इतर साथीदार तसेच, रविराज केदार व त्याचे इतर साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमविला. 

एकमेकांना शिवीगाळ करीत हातातील कोयते हवेत भिरकावले. मोठमोठ्याने आरडाओरडा करीत 'मध्ये कोणी आले, तर जिवे मारून टाकू', अशा धमक्‍या देत परिसरात दहशत माजविली. यामुळे परिसरातील नागरिकांनी आपापली घरे व दुकाने बंद केली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ceasefire: इस्रायलकडून बेरूतवर मोठा हवाई हल्ला; ८० जणांचा मृत्यू, १०० लोक जखमी, इराणकडून होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर बंदी

Shaktipeeth Highway On Raju Shetti : शक्तिपीठ महामार्गाच्या नवीन नकाशाला राजू शेट्टींचा विरोध, सांगली, कोल्हापुरातून पुन्हा आंदोलन पेटणार

MPSC Success Suraiya Desai : संसार सांभाळत स्पर्धा परीक्षेत यश; कोल्हापुरची सुरैया देसाईं महिलांमध्ये राज्यात प्रथम

Pune water supply news: पुण्यात १५ टक्के पाणी कपात टाळण्यासाठी गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न; समान पाणी पुरवठा योजना व स्मार्ट मीटरवर भर

Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

SCROLL FOR NEXT