Pimpri : वाहनांची तोडफोड करीत माजवली दहशत  sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri : वाहनांची तोडफोड करीत माजवली दहशत

तीन जणांना याप्रकरणी अटक केली आहे

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शस्त्राचा धाक दाखवत पाच जणांच्या टोळक्याने ढाबा चालकाकडील अडीच हजाराची रोकड काढून घेतली. त्यानंतर आजूबाजूच्या दहा वाहनांची तोडफोड करीत परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी (nigdi police) तीन जणांना अटक केली आहे. ही घटना निगडीतील (nigdi) ट्रान्सपोर्टनगर येथे घडली.

चौकोबा बबनराव शिंदे, यश हरी घोंगडे, संदीप प्रेमचंद गोलेछा (सर्व रा. निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बलजेदसिंग जागरसिंग सोही (रा. ट्रान्सपोर्टनगर, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सोही यांचा ट्रान्सपोर्टनगर येथे ढाबा आहे. बुधवारी (ता. ११) रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी ढाब्यासमोर थांबले होते. त्यावेळी पाच आरोपी कोयते व लाकडी दांडके घेऊन फिर्यादी यांच्याकडे आले. आरोपी आम्हाला जेवण दे असे म्हणाले असता फिर्यादीने जेवण बंद झाल्याचे सांगितले.

त्यावर आकाश उर्फ छोट्या खडका याने त्याच्याकडील कोयता फिर्यादीच्या गळ्याला लावला. तर तुषार शेंडगे याने फिर्यादी यांच्या खिशातून अडीच हजार रुपये काढून घेऊन मारहाण केली. 'तू जर पोलिसांना सांगितले तर तुला परत येऊन मारणार' असे म्हणत आरोपी निघून गेले. तेथून जाताना ढाब्याच्या आजूबाजूला उभ्या केलेल्या दहा टेम्पो व ट्रकच्या काचा कोयता व लाकडाने फोडून परिसरात दहशत निर्माण केली. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Currency : कोल्हापूरात बनावट नोटा बनवणारी टोळी उघडकीस; एक कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, टोळीचा मास्टर माईंड कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचारी

Jaykumar Gore : बार्शीच्या राऊतांचा पराभव एक अपघात होता; तालुक्याच्या विकासाचा वेग खंडित झाला

Uttar Pradesh Tourism : गोव्यासारखा सुट्टीचा आनंद लुटा युपीमध्ये; यमुना नदीच्या पवित्र पाण्यात मिळवा बोटींगचा आनंद!

Nobel Prize: ''मी डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल समर्पित करते'', मारिया मचाडो यांच्या निर्णयाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

Manache Shlok Movie Ban in Pune : पुण्यात "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडला!

SCROLL FOR NEXT