girl beaten by owner in bhiwapur of nagpur  
पिंपरी-चिंचवड

लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने केला प्रियकराचा खून

प्रेयसी अटकेत ; पिंपरीतील घटना

पांडे मंगेश

पिंपरी : लग्न करण्यास नकार दिल्याने प्रेयसीने प्रियकराचा गळा आवळून खून केला. ही घटना चिंचवड येथे घडली. पैगंबर गुलाब मुजावर (वय ३५, रा. एमआयडीसी, भोसरी) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी मुजावर यांच्या पत्नीने फिर्याद दिली असून त्यानुसार मुजावरच्या प्रेयसीला (वय २९) पोलिसांनी अटक केली आहे.

मुजावर व महिला आरोपी यांच्यात एक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, मुजावर हे आरोपी महिलेला भेटायला जात नाहीत. तसेच त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. या कारणावरून त्यांचे आरोपीशी वाद व्हायचे. दरम्यान, महिला आरोपीने शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी सहाच्या सुमारास मुजावर यांना चिंचवड स्टेशन येथील व्हाईट हाऊस लॉजिंग व बोर्डिंग येथे भेटायला बोलावले. तेथे त्यांच्यात वाद झाला. यादरम्यान आरोपी महिलेने मुजावर यांचा ओढणीने गळा आवळून खून केला. ही बाब रात्री उशिरा लॉज मधील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी मुजावर यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी मुजावर यांच्या प्रेयसीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने खुनाची कबुली दिली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''परळीतल्या गल्लीबोळातला स्टार प्रचारक...'', देशमुखांची धनंजय मुंडेंवर सडकून टीका

Sanjay Raut : आजारपणानंतर संजय राऊत पहिल्यांदाच माध्यमांसमोर; महायुतीवर जोरदार टीका, काँग्रेसला लगावला टोला, प्रकृतीबाबतही दिली अपडेट

Viral Video: चार वर्षांच्या बालिकेला सेविकेची मारहाण, जमिनीवर आपटले अन्... व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

टीव्हीवरचे बहिण-भाऊ खऱ्या आयुष्यात झाले नवरा बायको! मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात, फोटो चर्चेत

Kolhapur Crime : लग्न सोहळ्यासाठी आलेल्या 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; कात्यायनी मंदिर परिसरात उसाच्या शेतात नेऊन...

SCROLL FOR NEXT