Crime-Scene 
पिंपरी-चिंचवड

आकुर्डीत भरदिवसा २ लाखांची घरफोडी; कडीकोयंडा कापून चोरटे शिरले घरात

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - दरवाजाचा कडीकोयंडा कापून घरात शिरलेल्या चोरट्याने दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना भरदिवसा आकुर्डी येथे घडली.

जयवुन युसूफ सय्यद (वय 65, रा. गणेशनगरी, सी विंग, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर बंद असताना चोरट्याने सकाळी दहा ते सायंकाळी पावणे पाच या वेळेत दरवाजाचा कडीकोयंडा कापून घरात शिरला. किचन रूममधील लॉक न केलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली सोनसाखळी, कर्णफुले, अंगठी, सुटे मणी हे सोन्याचे दागिने व पाच हजारांची रोकड असा एकूण दोन लाख एक हजारांचा ऐवज लंपास केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही घटना सायंकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यासह आजूबाजूंच्या नागरिकांकडून माहिती घेत आरोपींचा शोध सुरू आहे. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Rate : आठवडाभरात सोने, चांदी हजारो रुपयांनी उतरले, खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे दर

Abhijit Deepke: अभिजीत दीपके यांच्या उपोषणासमोर आरोग्याचे आव्हान; 'या' कारणामुळे दीर्घकाळ उपाशी राहणे कठीण

Live Updates Marathi: बूस्टर सीड्स कंपनीविरोधात प्रहारचा संताप; कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न, कार्यकर्ते ताब्यात

राजकारण, गँगवॉर आणि विश्वासघाताचा थरार, ओटीटीवर चर्चेत असलेला 'हा' चित्रपट पाहिलात का?

Pune News: रुग्णांनी लक्ष द्या! IMAचा सोमवारी राज्यव्यापी संप; आपत्कालीन सेवा वगळता उपचार ठप्प

SCROLL FOR NEXT