sandalwood sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरीत चंदनाच्या सात झाडांची चोरी

महापालिकेच्या भोसरी येथील पर्यावरण संस्कार केंद्र उद्यानातील चंदनाची सात झाडे चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : महापालिकेच्या भोसरी (Bhosri) येथील पर्यावरण संस्कार केंद्र उद्यानातील चंदनाची (sandalwood) सात झाडे चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी निमा संघटनेने आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. सुरक्षेअभावी चोरीचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र याकडे महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

आठ एकर क्षेत्रात हे उद्यान वसलेले आहे. या वनक्षेत्रात विविध वनौषधी व दुर्मिळ गृहोपयोगी असे वृक्ष आहेत. यात चंदन, साग, बेल, हिरडा, आवळा, बेहडा आदींची मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून अज्ञात चोरट्यांनी या उद्यानातून सात चंदनाची झाडांची चोरून नेली आहेत.

ही झाडे करवतीसारख्या धारदार शस्त्राने कापून नेली. एका चंदनाच्या झाडाच्या गाभाऱ्याला सुगंध देण्यासाठी १२ वर्षे लागतात. उद्यानातील त्रुटींमुळे अशाप्रकारच्या बहुपयोगी वृक्षाच्या चोऱ्या होत आहेत. याप्रकरणी आयुक्त पाटील यांनी लक्ष देण्याची मागणी निमाचे सचिव डॉ. अभय तांबिले यांनी केली आहे.

या आहेत त्रुटी

पर्यावरण संस्कार केंद्राच्या तारेचे कुंपण तुटलेले आह. उद्यानामध्ये कुणीही सुरक्षा रक्षक (वॉचमन) कार्यरत नाहीत. या केंद्रात सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. सार्वजनिक शौचालय व लघुशंकेसाठी असलेल्या गोष्टींची दुरवस्था झाली आहे. अंतर्गत रस्त्यांवर गवत उगवले आहे. पथ दिवे नादुरुस्त आहेत. अंतर्गत कक्ष असलेल्या खोलीची दुरवस्था झाली आहे. त्या ठिकाणी उद्यान विभागाचे लक्ष अजिबात नसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market मध्ये नुकसान झालं नाशिकच्या दोन पठ्ठ्यांनी असा मार्ग निवडला की पोलिसांनीही डोक्याला हात मारला; नेमकं काय घडलं?

Robbery At SBI Bank : स्टेट बँकेच्या शाखेवर पिस्तूल, चाकूने धमकावून दरोडा, आठ कोटींचा ऐवज लुटला, पोलीस घटनास्थळी दाखल

Navratri 2025 Do's and Don'ts: शारदीय नवरात्रात काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी

Gold Rate Today : सोन्याच्या भावात अचानक वाढ, चांदीही चमकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Asia Cup 2025 Super Four Scenario: बांगलादेशच्या विजयाने सुपर ४ ची स्पर्धा रोमांचक वळणावर; ३ जागांसाठी ५ संघांमध्ये चुरस... पाकिस्तानचा फैसला आजच

SCROLL FOR NEXT