Crime Sakal
पिंपरी-चिंचवड

वकील असल्याचे खोटे सांगून बनावट कागदपत्रे बनवून केली तेरा लाखांची फसवणूक

वकील असल्याचे खोटे सांगून एका व्यक्तीच्या फ्लॅटचे बनावट रेरा व पीएमआरडीए नोंदणीची कागदपत्रे तयार केली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - वकील (Lawyer) असल्याचे खोटे सांगून एका व्यक्तीच्या फ्लॅटचे बनावट रेरा व पीएमआरडीए नोंदणीची कागदपत्रे Bogus Documents) तयार केली. त्याद्वारे फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करून एकाची तेरा लाख आठ हजारांची फसवणूक (Cheating) केली.

प्रसन्न शिरुडकर (वय ४१), शर्वरी प्रसन्न शिरुडकर (वय ४०, दोघेही ऍड्रसेस सोसायटी, रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमित दत्तात्रय घुले (रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या ओळखीचे ऍड. पठाण यांना भेटण्यासाठी गेले असता तिथे त्यांची आरोपींसोबत ओळख झाली. आरोपींनी फिर्यादी यांच्याशी ओळख वाढवून तुमचे दस्त करून देतो, असे सांगत फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

आरोपीने हे वकील नसतानाही त्यांनी फिर्यादी यांना आपण वकील असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांचे मांजरी बुद्रुक येथील शारदा कॉम्प्लेक्स व शारदा सुमन आर्केड या बिल्डिंग मधील १३ फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करून देतो असे सांगितले. त्यासाठी फिर्यादीकडून सातबारा उतारा, आठ (अ) उतारा तसेच फ्लॅट विक्रीचे मूळ दस्त घेतले. सात फ्लॅटचे १८ व १९ मे या दोन दिवसात दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक २५, दापोडी येथे बनावट रेरा व पीएमआरडीए नोंदणीचे कागदपत्र बनवून त्याचा वापर करून रजिस्ट्रेशन केले. यामध्ये फिर्यादी घुले यांची तेरा लाख आठ हजारांची फसवणूक केली. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Cheating Wife : गर्लफ्रेंडसोबत मलेशियाला जाण्याचा प्लॅन; पत्नीला सांगितले बिझनेस ट्रिप, विमानतळावरच बिंग फुटले, पुण्यातील उद्योगपतीचा कारनामा

Asian Games: भारताच्या लेकींचा धुमाकूळ! एलावेनिलचे दुहेरी यश, तर सचिकाचे MMA मध्ये पदक पक्के अन् क्रिकेटमध्येही वाजवला डंका

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

गणरायाला निरोप देताना आक्रित घडलं! कृत्रिम तलावात शॉक लागून १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू; लेकाचा मृतदेह पाहून वृद्ध वडिलांचा आक्रोश

ASTROLOGY: या ३ तारखांना जन्मलेले लोक असतात कुबेराचे लाडके? धन-दौलत, प्रॉपर्टीच्या बाबतीत मिळतो भाग्याचा साथ; तुमची जन्मतारीख कोणती?

SCROLL FOR NEXT