बेदम मारहाण
बेदम मारहाण sakal
पिंपरी-चिंचवड

जुन्या भांडणावरून तिघांना बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : जुन्या भांडणावरून टोळक्याने तिघांना बेदम मारहाण केली. हा प्रकार फुगेवाडी येथे घडला. याप्रकरणी अजय शंकर जाधव (रा. फुगेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश बापू आय्याळी, गणेश बापू आय्याळी (दोघेही रा. संजयनगर झोपडपट्टी, फुगेवाडी), उमेश पात्रे (रा. दापोडी) व इतर सहा जण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी योगेश, गणेश व उमेश यांनी १८ मे २०२१ ला फिर्यादी यांचा भाचा कौशल याला मारहाण केली होती.

या भांडणाचा राग होता. तसेच आरोपी गणेश याच्या आईकडे फिर्यादी यांनी पानदुकानाच्या उधारीचे पैसे मागितले होते. याचाही राग होता. या कारणावरून बुधवारी (ता. ८) रात्री साडे अकराच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी यांच्या घराजवळ जमाव जमवला. फिर्यादीला मारहाण करीत मारण्याची धमकी दिली व दगडफेक केली. या मारहाणीत फिर्यादीसह त्यांची पत्नी व पुतणी यांना दुखापत झाली. तसेच आरोपींनी फिर्यादी यांच्या दुचाकीची तोडफोड करून सात हजारांचे नुकसान केले. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकरांना त्यांचा हक्क परत करण्यासाठी आलोय; PM मोदींचे शिवाजी पार्कच्या सभेत प्रतिपादन

Raj Thackeray: मराठीला अभिजात दर्जा, मराठ्यांचा इतिहास अन् मुंबई-गोवा महामार्ग...; राज ठाकरेंनी मोदींकडं व्यक्त केल्या ७ अपेक्षा

RCB vs CSK : खेळ आरसीबी, सीएसके अन् पावसाचा; प्ले ऑफचा चौथा संघ ठरवणारा सामना

भाषणाची सुरुवात नेहरुंच्या नावाने केली अन् मोदी तिसऱ्यांचा पंतप्रधान झाल्याचं राज ठाकरेंनी केलं जाहीर

गौतम अदानींनी तिच्यासाठी केला मदतीचा हात पुढे; जाणून घ्या काय आहे 'लवली'ची व्यथा!

SCROLL FOR NEXT