Crime sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : वकीलाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

तिघांनी मिळून वकील असलेल्या तरुणाकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार चऱ्होली व आळंदी परिसरात घडला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - तिघांनी मिळून वकील असलेल्या तरुणाकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार चऱ्होली व आळंदी परिसरात घडला.

किसन तापकीर, सतीश तळेकर, लक्ष्मीकांत रासकर (तिघेही रा. वडमुखवाडी, चऱ्होली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अ‍ॅड. कैलास विनायक तोंडे (रा. वडमुखवाडी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे वकील असून २०१७ मध्ये त्यांची लक्ष्मीकांत रासकर यांच्यामुळे किसन ज्ञानोबा तापकीर यांच्याशी ओळख झाली. २०१९ मध्ये किसन तापकीर यांच्याशी किरकोळ कारणावरून फिर्यादी यांचा वाद झाला.

दरम्यान, फ्लॅटच्या उद्घाटनाला आरोपींना बोलावले नाही. त्याचा राग मनात धरून तापकीर यांनी फिर्यादी यांना पैशांसाठी टॉर्चर करण्यास सुरुवात केली. दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांच्या मित्रांसोबत भागिदारीत व्यवसाय सुरू केला. त्यामुळे तापकीर यांना पैसे मिळणे बंद झाले. त्यावरून ते फिर्यादी यांना टॉर्चर करत होते. १० नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता तापकीर यांनी फिर्यादी यांना फोन करून आळंदी देहूफाटा या ठिकाणी एका हॉटेलवर बोलावले. तेथे हॉटेलमधील एका खोलीत आरोपी दारू पीत असताना फिर्यादी तिथे गेले. तापकीर यांनी त्यांना शिवीगाळ करून वीस लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच मारहाण केली. 'तू ऑफिस कसे उघडतो' अशी धमकी दिली. पाच गुंठे जागा माझ्या नावावर कर नाहीतर तुला व्यवसाय करू देणार नाही, असे म्हणत फिर्यादी यांना हॉटेलच्या खोलीत डांबून ठेवले. फिर्यादी यांनी पैसे देण्यास होकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना एका तासानंतर हॉटेलच्या रूममधून सोडून दिले. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Rishi Panchami 2026: ऋषी पंचमी महिलांसाठी खास का असते? १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासण्यामागचं कारण काय?

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

SCROLL FOR NEXT