wakad sakal
पिंपरी-चिंचवड

हिंजवडी आयटी पार्कजवळ आढळून आले बिबट्याचे तीन बछडे

नेरे गावातील घटना ; वनाधिकाऱ्यांनी अनिमिल रेस्क्यू टीमने बछडे घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

वाकड : आयटी पार्क हिंजवडी शेजारील पंचक्रोशीत गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने बिबट्याचा वावर आढळला आहे गेल्या वर्षी नेरे येथील शेतकऱ्याच्या दोन वासरांना बिबट्याबे ठार केले तर पाच कोंबड्या फस्त केल्याची घटना देखील घडली असताना सोमवारी (ता २४)पुन्हा नेरे येथील उसाच्या फडात बिबट्याची मादी जातीचे तीन बछडे आढळून आले.

नेतेतील शेतकरी मोहन जाधव यांच्या शेतात ऊस तोडणी करताना विठ्ठल पालवे या कामागराला ही बछडी आढळली जाधव यांनी तात्काळ ही माहिती वनविभाला कळविली त्यानुसार घटनास्थळी पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल मीरा केंद्रे, वनरक्षक पांडूरंग कोपणर यांच्यासह प्राणी मित्र शेखर जांभूळकर, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश सोरटे, राहुल जाधव, अनिमल रेस्क्यू टीम, चॉईल्ड अनिमल अँड स्नेक प्रोटेक्शन, वन्यजीव रक्षक संघटेनेचे स्वयंसेवक दाखल झाले.

वन अधिकारी व रेस्क्यू टीमने ही बछडी ताब्यात घेतली असून लोकांची गर्दी टाळण्यासाठी वनपरीक्षेत्र कार्यालयात अधिकाऱ्यांच्या देखरेखीत ठेवण्यात आली आहेत. ही बछडे १५ दिवस ते महिनाभर वयाची असावीतत्यामुळे त्यांना त्यांच्या मादीची गरज असल्याने सायंकाळी जिथे बछडी सापडलीत्याच ठिकाणी ती पुन्हा सोडण्यात येणार आहेत त्यामळे बिबट्या मादी त्या बचड्यांना घेऊन जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये असे आवाहनही वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT