पवनानगर, ता. ३१ ः पवना शिक्षण संकुलात आदिवासी विद्यार्थी व आदिवासी जात प्रमाणपत्र शिबिर झाले. आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून हे शिबिर झाले. या वेळी ३५० लाभार्थींनी सहभाग नोंदविला होता. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे व प्रा. अंजली दौंडे यांनी या शिबिराचे आयोजन केले.
यावेळी बोलताना प्रा. दौंडे म्हणाल्या, ‘‘विद्यार्थ्यांना सरकारी पातळीवर अनेक शिष्यवृत्ती योजना मिळत असतात. परंतु पुरेशी कागदपत्रे व दाखले नसल्याने त्यांना शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे या शिबिरात दाखले मिळाल्याने त्यांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे.’’ शिबिरात वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक प्रमुख चव्हाण, प्राध्यापक दादासाहेब सितापुरे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, महागाचे सरपंच सोपान सावंत, कालेचे सरपंच खंडू कालेकर, संजय मोहोळ, प्रवीण घरदाळे, आरती घारे, पर्यवेक्षिका नीला केसकर, बाळासाहेब सातकर, सुजित सातकर, कुंडलिक राऊत, रूपेश सोनुने, सूरज ठाकर, योगेश तुपे आदी उपस्थित होते. गणेश ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. राजकुमार वरघडे यांनी आभार मानले.
Media Id: PVN22B01218
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.