पिंपरी, ता. २२ ः ‘‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड हे इंजिनिअरींग क्षेत्रातील तरुणांच्या स्वप्नातील शहर आहे. इंजिनिअरींगला येथे खूप मोठी चालना मिळते. स्टार्टअपच्या माध्यमातून नवउद्योजक घडविण्यासाठी स्टार्ट-अप आणि इनक्युबेशन सेंटर हे महत्त्वाची भूमिका बजावित आहेत. या सेंटरची दोन वर्षातील कामगीरी वाखण्याजोगी असून नव स्टार्टअपला गुंतवणुकदार व व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्यभरात अग्रेसर भूमिका बजावत आहे,’’ असे मत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स व ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत स्मार्ट सिटीच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड स्टार्ट-अप ॲंड इनक्युबेशन सेंटरच्या द्वितीय वर्धापनदिनानिमीत्त आयोजित ‘पीसीएसआयसी स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह-२०२१’’ च्या उद्घाटनप्रसंदी मेहता बोलत होते. महापौर उषा ढोरे अध्यक्षस्थानी होत्या. सिम्बॉयोसीस युनिर्व्हसिटीच्या प्रो-कुलगुरु डॉ. स्वाती मुजूमदार, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, नगरसेवक सचिन चिखले, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, ऑटो क्लस्टरचे मॅनेजिंग डायरेक्टर किरण वैद्य, मॅनेजर उदय देव आदी उपस्थित होते. या निमित्त ऑटो क्लस्टर परिसरात वृक्षारोपण केले. हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत व जवानांना श्रद्धांजली वाहिली. यशस्वी महिला उद्योजकांची यशोगाथा पुस्तकाचे प्रकाशन झाले. स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह कार्यक्रमासाठी १२७ नवस्टार्टअपची नोंदणी झाली आहे. ५० स्टार्टअपचे सादरीकरण झाले. महिला उद्योजकता व त्यांना उपलब्ध संधी, महिला उद्योजकता वाढीसाठी एकसंध परिसंस्था निर्माण करणे, यशस्वी महिला उद्योजकांच्या यशोगाथा, कोविड नंतरच्या परिस्थितीवर गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन, स्टार्ट-अपसाठी संभाव्य निधी उभारणीसाठी गुंतवणूकदारांसोबतची चर्चा आदी विषयांवर चर्चा झाली. नयन जयप्रकाश यांनी सूत्रसंचालन केले.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले...
आज नवीन रोजगार निर्माण करणाऱ्या तरुणांची गरज आहे. त्यांच्यात स्टार्टअपची क्रेझ आहे. नवउद्योजकांच्या उभारीसाठी महापालिकेने स्टार्ट-अप ॲंड इनक्युबेशन सेंटरद्वारे व्यासपीठ उभारले आहे. ऑटोमोटीव्ह इंजिनिअरींग, बायोफार्मा, माहिती तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र या क्षेत्रांमध्ये नवनिर्मिती, सहयोग व उद्योजकता यांना प्रोत्साहन देणे हे सेंटरचे उद्दिष्ट आहे. नवउद्योजकांसाठी सहा आठवड्यांचा विनामूल्य कॅप्सूल कोर्स सुरू आहे. १८० पेक्षा अधिक स्टार्टअप्स सहभागी आहेत. महिला नवउद्योजकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या...
रोजगाराच्या मागे न धावता महिलादेखील उद्योजकांच्या शर्यतीत उतरल्या आहेत. उद्योजक म्हणून महिलांची संख्या कमी असली तरी बाजारपेठ आणि विक्रीचे योग्य नियोजन करून त्या देखील उद्योग क्षेत्रात भरारी घेत आहेत. आजच्या घडीला बेरोजगार हातांना रोजगार देणाऱ्या तरुण नवउद्योजकांची गरज असून ही कमतरता लक्षात घेवून तरुणांनी स्टार्टअपचे नियोजन करणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य सरकारतर्फे तरुणांसाठी अनेक योजना राबविल्या जात असून महिलांनी त्याचा लाभ घ्यावा.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.