Covishield and Covaxin
Covishield and Covaxin Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये शनिवारी कोव्हिशिल्डचे २८,०००; कोव्हॅक्सिनचे २८०० डोस उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी महापालिकेकडे कोव्हिशिल्ड लशीचे २८ हजार आणि कोव्हॅक्सिन लशीचे दोन हजार ८०० असे ३० हजार ८०० डोस उपलब्ध झाले आहेत.

पिंपरी - कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी महापालिकेकडे कोव्हिशिल्ड (Covishield) लशीचे २८ हजार आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) लशीचे दोन हजार ८०० असे ३० हजार ८०० डोस उपलब्ध झाले आहेत. ते देण्याची व्यवस्था शनिवारी (ता. २५) अनुक्रमे ५६ व आठ अशा ६४ केंद्रांवर केली आहे. परदेशात जाणाऱ्यांसाठी नवीन जिजामाता रुग्णालयात दोनशे डोस राखीव ठेवले आहेत. सर्व केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवले आहे. (covishield 28000 and covaxin 2800 dose available in pimpri chinchwad on saturday)

कोव्हिशिल्ड लशीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. कोव्हिशिल्डचे प्रत्येक केंद्रावर ५०० आणि कोव्हॅक्सिनचे प्रत्येक केंद्रावर साडेतीनशे डोस उपलब्ध आहेत. दोन्ही प्रकारच्या लशींचे प्रत्येकी ५० टक्के डोस ऑन दि स्पॉट नोंदणी करून व किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन दिले जाणार आहेत. लस घेण्यासाठी ‘कोविन ॲप’ वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. लशीकरणाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा अशी आहे. मात्र, वायसीएम रुग्णालयात दुपारी दोन ते रात्री आठ या वेळेत लस दिली जाणार आहे. परदेशात जाणाऱ्यांसाठी पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी प्रत्येकी शंभर डोस नवीन जिजामाता रुग्णालयात राखीव ठेवले आहेत.

कोव्हिशिल्डचे ११ तास केंद्र

महापालिकेचे कुटे हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी आणि दीनदयाळ शाळा संत तुकारामनगर पिंपरी या केंद्रांवर सकाळी नऊ ते रात्री आठ असे ११ तास कोव्हिशिल्ड लस देण्याची व्यवस्था केली आहे.

कोव्हॅक्सिनसाठी केंद्र

ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे.

गर्भवतींसाठी राखीव

स्तनदा माता व गर्भवतींसाठी जुने भोसरी रुग्णालय, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, वायसीएम हॉस्पिटल संत तुकारामनगर पिंपरी (दुपारी २ ते रात्री ८), अहिल्याबाई होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT