पिंपरी-चिंचवड

वाहन चोरीचे सत्र थांबता थांबेना एकाच दिवशी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल; एक लाख ३५ हजारांचा मुद्देमाल चोरीला

CD

पिंपरी, ता. ११ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरीचे सत्र थांबत नसल्याचे दिसून येते. विविध पोलिस ठाण्यात सोमवारी एकाच दिवशी आठ घटनांची नोंद झाली. यामध्ये एकूण एक लाख ३५ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला.

ताथवडे येथील विजन मॉलसमोरील रस्त्यावरून राहुल अनिलकुमार सिंग (रा. भगवाननगर, भूमकर चौक, वाकड) यांची दहा हजारांची दुचाकी चोरीला गेली. तर अतुल गोविंदराव माने (रा. अशोका हौसिंग सोसायटी, थेरगाव) यांची पंधरा हजार रुपये किमतीची दुचाकी, विनीत उदय पाटील (रा. अमरदीप कॉलनी, गल्ली क्रमांक एक, ज्योतिबा कॉलनी, काळेवाडी) यांची पंचवीस हजारांची दुचाकी घराजवळून तर दिनेश ज्ञानदेव जासूद (रा. ज्ञानेश्वर कॉलनी, थेरगाव) यांची दहा हजारांची दुचाकी थेरगाव येथून चोरीला गेली. या चारही घटनेप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पाचवी घटना चिखलीतील कुदळवाडी येथे घडली. अब्दुल रज्जाक खान (रा. भैरवनाथ मंदिरामागे, कुदळवाडी, चिखली) यांची दहा हजारांची दुचाकी कुदळवाडीतील मोरे-पाटील चौक येथून चोरट्यांनी लंपास केली. चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. चाकणमधील म्हाळुंगे येथील सुजलॉन जनरेटर्स कंपनीसमोरून अनिल प्रभाकर लहाने (रा. तापकीरनगर, आळंदी ) यांची पंचेचाळीस हजारांची दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपर्णा रुकीराम गौतम (रा. शिवदर्शन कॉलनी, मोहननगर, चिंचवड) यांची वीस हजारांची दुचाकी घराजवळून चोरीला गेली. पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दरदिवशी विविध पोलिस ठाण्यात वाहनचोरीच्या घटनांची नोंद होत आहे. मात्र, चोरीचे वाहन सापडण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून येते. भरदिवसा, भररस्त्यातूनही काही क्षणात वाहन चोरीला जात असल्याचे समोर येत आहे. वाढत्या वाहनचोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत आयुक्तालयाच्या हद्दीत वाहनचोरीच्या एक हजार ३५० घटना घडल्या. यामध्ये दुचाकी एक हजार २३८, तीन चाकी ४२, चारचाकी सत्तर वाहनांचा समावेश आहे. तर चोरीला गेलेल्या वाहनांपैकी केवळ ३१६ वाहने सापडली आहेत.

२०२१ मधील वाहनचोरीच्या घटना

वाहन दाखल उघड
दुचाकी १२३८ २७३
तीन चाकी ४२ १५
चारचाकी ७० २८

एकूण १३५० ३१६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT