vaccine for child child vaccination Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरातील पंचवीस टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण

पिंपरी चिंचवड शहरातील १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला मुलासंह पालकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी चिंचवड शहरातील १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला मुलासंह पालकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पिंपरी - शहरातील १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या (Children) कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला (Corona Vaccination) मुलासंह पालकांचाही (Parents) चांगला प्रतिसाद (Response) मिळत आहे. त्यामुळे अवघ्या आठ दिवसांत २९ हजार ३९० मुलांनी लस घेतली आहे. हे प्रमाण शहरातील मुलांच्या एकूण लसीकरण उद्दिष्टाच्या २५ टक्के झाले आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. त्यासाठी महापालिकेने स्वतंत्र केंद्रांची निर्मिती केली आहे. शहरात चार जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एका केंद्रांवर किमान पाचशे डोस उपलब्ध आहेत. त्यांवर क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियंत्रण असून, त्याअंतर्गत लसीकरण सुरू आहे. कोविन ॲपद्वारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने ५० टक्के आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करून ५० टक्के लशीचे डोस दिले जाणार आहेत.

दृष्टिक्षेपात मुलांचे लसीकरण

एकूण उद्दिष्ट - १,१६,७००

लस घेतलेली मुले - २९,३९०

लसीकरण राहिलेली मुले - ८७,३१०

गेल्या आठवड्यात मी शुक्रवारी लस घेतली. कोणताही त्रास झाला नाही. पण, लस घेतल्यानंतर दोन दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. माझ्या मित्रांनीही लस घेतली आहे. त्यांनाही त्रास झालेला नाही.

- योगेश चव्हाण, बारावीतील विद्यार्थी

मुलांच्या लसीकरणाला पालकांचाही प्रतिसाद मिळत आहे. पालकच मुलांना घेऊन लसीकरण केंद्रांवर येत आहेत. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात लसीकरण केंद्र सुरू आहेत.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

बूस्टर डोस @ १४६९

महापालिकेतर्फे हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाइन वर्कर, ६० वर्षांवरील नागरिक आणि रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हृदयविकार अशा सहव्याधी असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा प्रिकॉशन अर्थात बूस्टर डोस दिला जात आहे. मात्र, दुसरा डोस घेऊन नऊ महिने अथवा ३९ आठवडे झालेल्यांनाच बूस्टर डोस दिला जात आहे. आतापर्यंत एक हजार ४६९ जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. त्यात हेल्थ केअर व फ्रंट लाइन वर्कर ८२० असून ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ६४९ नागरिकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT