pune lonavala local train
pune lonavala local train sakal
पिंपरी-चिंचवड

पुणे-लोणावळा लोकल प्रवाशांची निराशा

सकाळ वृत्तसेवा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अंदाजपत्रक जाहीर केले. त्यात औद्योगिक क्षेत्र असलेल्या पुणे ते लोणावळा दरम्यान सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांची दखल न घेतल्यामुळे निराशा झाली आहे.

पिंपरी - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी अंदाजपत्रक (Budget) जाहीर केले. त्यात औद्योगिक क्षेत्र असलेल्या पुणे ते लोणावळा (Pune to Lonavala) दरम्यान सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांची (Passenger) दखल न घेतल्यामुळे निराशा (Disappoint) झाली आहे. गेल्या ३५ वर्षात रेल्वेमंत्री, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक, रेल्वे बोर्ड यांच्याबरोबर सातत्याने चिंचवड प्रवासी संघ पत्रव्यवहार करीत आहे. परंतु, केवळ लेखी पत्र व आश्वासनच मिळाले. याचा चिंचवड प्रवासी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे.

गेल्या महिन्यात मध्य रेल्वेचे व्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी चिंचवड रेल्वे स्थानक पाहणी केली. या शहराची लोकसंख्या २७ लाखांहून अधिक आहे. ६५० मोठे उद्योग समूह १० हजारांच्या आसपास मध्यम व लघू उद्योग, व्यावसायिक आहेत. शहरात गुजरात, आंध्र प्रदेश परिसरातील दोन लाख लोक वास्तव्य करतात. दक्षिण भारतातील केरळ, मद्रास परिसरातील तीन लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार परिसरातील पाच लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. पश्चिम बंगाल, कलकत्ता परिसरातील दीड लाख लोकसंख्या आहे. आठ लाखांहून अधिक लोक नोकरी व्यवसायामुळे स्थायिक झाले आहेत. दररोज १५० हून अधिक एक्स्प्रेस गाड्या, मालवाहू गाड्यांची ये-जा असते. कल्याण, दादर, पनवेल येथे जाऊन पुढील प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळ, पैसा, शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी सूरज आसदकर, मनोहर जेठवाणी, नारायण भोसले, मुकेश चुडासमा, हार्दिक जानी, नयन तन्ना, निर्मला माने, नंदू भोगले, दिलीप कल्याणकर, दादासाहेब माने, सल्लागार अ‍ॅड. मनोहर सावंत, डॉ. राजेंद्र कांकरीया, डॉ. पोर्णिमा कदम यांनी निषेध नोंदवला.

महापालिकांची मदत नाही

राज्य सरकारने पुणे-लोणावळा दरम्यान ६३ किलोमीटर रेल्वे मार्गावर तिसऱ्या‍ व चौथ्या रेल्वे लाईनसाठी एकूण ४३०० कोटी रुपयांच्या खर्चापैकी पुणे महापालिकेने ३७५ कोटी व पिंपरी-चिंचवड महापालिकेने २५० कोटी रुपयांचा खर्च उचलणे बंधनकारक आहे. तो त्यांनी न दिल्यास संपूर्ण प्रकल्प गुंडाळला जाऊ शकतो. पर्यायाने एकही नवीन लोकल पुणे-लोणावळा दरम्यान सुरू होऊ शकणार नाही. दोन्ही महापालिकेने आजतागायत रेल्वेला आर्थिक मदत दिली नाही.

पुणे लोणावळा रेल्वे चौपदरीकरणासाठी राज्य शासनाचे पुढे काही निर्देश नाहीत. ठराव मंजूर झालेला आहे. पुढे माहिती घ्यावी लागेल. अद्यापतरी प्रस्ताव प्रलंबित आहे.

- बापू गायकवाड, वाहतूक शाखा, कार्यकारी अभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

SCROLL FOR NEXT