PCMC PMRDA Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : प्राधिकरणाच्या फायलींचा निपटारा

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणमध्ये (पीएमआरडीए) विलनीकरण नऊ महिन्यांपूर्वी झाले.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणमध्ये (पीएमआरडीए) विलनीकरण नऊ महिन्यांपूर्वी झाले.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) नवनगर विकास प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणमध्ये (पीएमआरडीए) (PMRDA) विलनीकरण (Merger) नऊ महिन्यांपूर्वी झाले. त्यानंतर प्राधिकरणातील (Pradhikaran) पेठ क्रमांक पाच व आठ येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, पेठ क्रमांक नऊ, अकरा, बारा आणि भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्र यांचे एकूण क्षेत्र महापालिकेकडे (Municipal) आले आहे. विलनीकरण झाल्यानंतर महापालिकेच्या ताब्यातील ४९१ फायलींचा (File) निपटारा करण्यात आल्याचे भूमी व जिंदगी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

‘पीएमआरडीए’च्या पेठ क्रमांक ४, ७, १०, १८ ते २२ तसेच, २६,२७, २७ ए, २७ जनता, सीडीसी, १, २, ३० ते ३७, २४, २५, ३८ ते ४२, १५, १५ए, २२, २३, २८, २९ तसेच १२.५० टक्के परतावा फाईल महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. महापालिकेकडील एकूण क्षेत्र ३७५.९० हेक्टर आहे. संबंधित क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ‘पीएमआरडीए’ची नियुक्ती केली आहे. उर्वरित, क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेची नियुक्ती केली आहे.

प्राधिकरणाने महापालिकेला पेठ क्रमांक १ ते २० मधील फाईलचा ताबा घ्यावा, यासाठी महापालिका प्रशासनासोबत नोव्हेंबर महिन्यात पत्रव्यवहार केला होता. त्यातील कागदपत्रे हस्तांतर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. बऱ्याच दिवसांपासून हे रेकॉर्ड महापालिकेत पडून हेाते. त्यातील सर्व फायलींचा निपटारा केल्याचे भूमी जिंदगी विभागाच्यावतीने सांगितले आहे.

प्राधिकरणाकडील भूखंडांचे महापालिकेला हस्तांतर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या हजार फायलींचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. पेठ क्रमांक १ ते २८ मधील कागदपत्रांसाठी ही प्रक्रिया करण्यात आली आहे. पेठ क्रमांक २९ मधील कागदपत्रांचे स्कॅनिंग सध्या सुरू आहे. प्राधिकरणाकडून आलेल्या या फायलींची निगा व अन्य देखभालीच्या कामासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे.

फायलींचे आकडे...

  • हस्तांतर अर्ज : .... १७१

  • वारस नोंद : ............... ३७

  • ना हरकत : ...... ९४

  • इतर : ............ ९४

  • माहिती अधिकार : .... २३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT