Housing Finance
Housing Finance Sakal
पिंपरी-चिंचवड

सदनिकांसाठी स्वहिस्सा भरायचा कसा? PM आवास योजनेतील लाभार्थींची व्यथा

सकाळ वृत्तसेवा

‘माझ्या वडिलांचे वय ५७ वर्ष आहे. सदनिकेसाठी ते लाभार्थी ठरले आहेत. पण, त्यांचे वय जास्त असल्याने बॅंका कर्ज द्यायला तयार नाहीत,’ पस्तीशीतील तरुण सांगत होता.

पिंपरी - ‘माझ्या वडिलांचे वय ५७ वर्ष आहे. सदनिकेसाठी ते लाभार्थी (Beneficiaries) ठरले आहेत. पण, त्यांचे वय जास्त असल्याने बॅंका कर्ज (Bank Loan) द्यायला तयार नाहीत,’ पस्तीशीतील तरुण सांगत होता. ‘राष्ट्रीयकृत बॅंका कर्ज देत नाहीत. त्यामुळे खासगी पतसंस्था व फायनान्स कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. पण, त्यांचे व्याजदर बारा टक्क्यांपेक्षा अधिक आहे, इतके कर्ज कसे फेडायचे,’ अशा अडचणी आहेत, पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या. समोर घर दिसत असतानाही ते घेण्यासाठीची स्वहिस्सा रक्कम कशी उभारायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

महापालिकेतर्फे चऱ्होली व बोऱ्हाडेवाडीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प उभारला जात आहे. त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यातील सदनिकांसाठी नागरिकांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी होऊन त्यांची सोडत गेल्या वर्षी फेब्रुवारीत काढण्यात आली. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून दहा टक्के स्वहिस्सा रक्कम भरण्यास सांगितले. त्यासाठी १५ डिसेंबर २०२१ ते १५ जानेवारी २०२२ अशी मुदत होती. त्यांना मुदतवाढही दिली होती. १० टक्के स्वहिस्सा रक्कम भरलेल्या लाभार्थींकडून कागदपत्रांची व उर्वरित स्वहिस्सा रकमेसाठी पूर्तता करण्यात आली. मात्र, बहुतांश लाभार्थींनी अद्याप स्वहिस्सा रक्कम भरलेली नाही. सद्यःस्थितीत चऱ्होली प्रकल्पाचे काम ६० टक्के झाले असल्याने त्यातील लाभार्थींना ४० टक्के स्वहिस्सा भरायचा आहे. बोऱ्हाडेवाडी प्रकल्पाचे काम ९० टक्के झाले असून, त्यातील लाभार्थींना ८० टक्के स्वहिस्सा रक्कम भरायची आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बॅंक व मोठ्या खासगी बॅंका सिबिल स्कोअर खराब असल्याने कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे खासगी वित्त संस्थांचा आधार घेण्याची वेळ लाभार्थींवर आली आहे. मात्र, काहींनी स्वहिस्सा रक्कम भरली आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने महापालिकेतर्फे आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. त्यात लाभार्थी ठरलेल्या व प्रथम १० टक्के स्वहिस्सा भरलेल्या चऱ्होली प्रकल्पातील लाभार्थींना ४० टक्के व बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील लाभार्थींना ८० टक्के भरण्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत लाभार्थींनी स्वहिस्सा रक्कम भरावी, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे. दोन्ही प्रकल्पातील लाभार्थींना केंद्र व राज्य सरकार मिळून अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

- अण्णा बोदडे, सहायक आयुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, महापालिका

दृष्टिक्षेपात पंतप्रधान आवास योजना

चऱ्होली प्रकल्प

एकूण सदनिका - १४४२

१० टक्के स्वहिस्सा - ६१,९००

८० टक्के स्वहिस्सा - ५,३५,२००

बोऱ्हाडेवाडी प्रकल्प

एकूण सदनिका - १२८८

१० टक्के स्वहिस्सा - ५७,१००

८० टक्के स्वहिस्सा - ४,९६,८००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Baramati lok sabha: मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT