पिंपरी-चिंचवड

‘स्मार्ट’ कामांवर कमांड सेंटरचा ‘वॉच’ स्मार्ट सीटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी पोमण यांची माहिती

CD

पिंपरी, ता. ७ ः स्मार्ट सिटी संबंधित घटकांशी संपर्क साधणे व त्यांचे मूल्यमापन करून सिटी ऑपरेशन सेंटरची रचना केली आहे. त्याद्वारे संपूर्ण कामकाजाचे तटस्थतेने निरीक्षण केले जात असून, डॅशबोर्डच्या माध्यमातून इंटीग्रेटेड स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सिस्टीममधील (आयएससीसीसी) प्रत्येक घटकाचे लाईव्ह स्टेटस् समजत आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अध‍िकारी निळकंठ पोमण यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या एबीडी व पॅन सिटी प्रकल्पांच्या कामांची संचालक मंडळाने पाहणी केली. यात संचालक तथा महापौर उषा ढोरे, नामदेव ढाके, सचिन चिखले, जैवविविधता समिती अध्यक्षा उषा मुंढे, कार्यकारी अभियंता दूरसंचार थॉमस नरोन्हा, माहिती व तंत्रज्ञान अध‍िकारी विजय बोरुडे, प्रोग्राम मॅनेजर चंद्रकांत देशपांडे, नितीन बियाणी, ऑपरेशन हेड सुजित वानखेडे आदी उपस्थ‍ित होते. त्यांनी निगडी येथील इंटिग्रेटेड स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सिस्टीम सेंटरला भेट देऊन, पॅन सिटीच्या डिजिटल प्रकल्पांची प्रगती व माहिती जाणून घेतली. पोमण यांनी प्रकल्पांची माहिती दिली.
ऑटोमेशन आणि मनुष्यबळाद्वारे केली जाणारी कामे आणि प्रक्रिया नियंत्रित करणे, विविध संस्थांबरोबर एकत्र काम करणे, समस्या सोडविणे, माहितीचे रिअल टाइम विश्लेषण, जनजागृती आणि प्रतिसाद या कार्यपद्धतीद्वारे लोकांचा सहभाग करून घेणे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने प्रतिसाद आणि आपत्ती व्यवस्थापन, शासकीय व्यवस्थांमध्ये सुलभता आणणे, योग्य वाहतूक नियंत्रण आणि व्यवस्थापन, शहराच्या आरोग्याशी संबंधित परिस्थितीचे यथायोग्य विश्लेषण, सुरक्षितता आणि कायद्याची अंमलबजावणी, आयसीटीच्या पायाभूत सुविधांमध्ये डेटा सेंटर, क्लाऊड, नेटवर्क, सुरक्षा आणि शहरातील विविध सेवांशी जोडले जाण्यासाठी आवश्यक असणारे हार्डवेअर, नागरिककेंद्री सेवा, स्मार्ट सिटी अॅप्स आणि वेब पोर्टल, स्मार्ट सुविधा आणि माहिती देणारे इन्फॉर्मेशन डिस्प्ले याबाबत संचालकांनी माहिती जाणून घेतली.

आयएसीसीसीचे मॉनिटेरिंग
स्मार्ट पर्यावरण व्यवस्थापन, वाहनतळ, वाहतूक, जल अर्था चांगले व प्रदूषित पाणी, समूदाय, महापालिका, परिवहन अशा स्मार्ट सिटी संबंधित व्यवस्थापन घटकांशी संपर्क साधणे व त्यांचे मूल्यमापन करून सिटी ऑपरेशन सेंटरची रचना केली आहे. त्याद्वारे संपूर्ण कामकाजाचे तटस्थतेने निरीक्षण केले जात आहे.
---
फोटो ः 34354

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT