ऊर्से, ता. २८ : जागतिक अमली पदार्थ व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त २८ जून रोजी ‘स्माईल सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले. यामध्ये एनडीआरएफ, सीआरपीएफ बटालियनचे २४२ जवान, विविध सायकल क्लबचे सायकलस्वार, पोलिस बांधव व नागरिक असे साडेचारशेपेक्षा जास्त सायकलस्वार सहभागी झाले होते. याची सांगता ऊर्से येथे झाली.
याप्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील, संतोष परदेशी, प्रशांत ताये, प्रदीप टेकवडे, दीपक फल्ले, बसप्पा भंडारी, निखिल महापात्रा व स्माईलचे संस्थापक हर्षल पंडित व अतिथी म्हणून आयर्नमॅन कझखस्थान धनराज हेळांबे, युथ आयकॉन राम गोमारे, सूरज जाट उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय येथे व्यसनमुक्तीची शपथ घेऊन विविध घोषणा देत स्माईल सायक्लोथॉनची सकाळी सुरुवात झाली. ‘भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी’ तसेच व्यसनांच्या विरोधात विविध घोषणा देत स्माईल व्यसनमुक्ती केंद्र, उर्से येथे या रॅलीची सांगता झाली. पूर्ण मार्गावर पाणी व थंड पेय यांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी नशामुक्त भारत अभियानासाठी सर्वोतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. प्रत्येक सायकलस्वारास मेडल, टी शर्ट, प्रशस्तीपत्र, नाष्टा व शीतपेय देण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी राहुल बोरुडे, रोहन यादव, नितिन नाटेकर, हर्षल जोशी, राहुल केळकर, जयंत खेर्डेकर, आनंद भागवत, अजिंक्य देशपांडे, अक्षय सांडीम, अमेय कुलकर्णी, गणेश गुंडरे, राजेंद्र ढूस, नीलेश साळूंके, प्रशांत टोणगे यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.