उर्से, ता. ११ : परंदवडी येथे इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या एनएसएस युनिट तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमात इंदिरा ग्रुपचे चेअरमन तरीता शंकर, चेतन वाकळकर, नीलेश उके यांच्यासह संचालक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विविध प्रजातींची रोपे लावण्यात आली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनावर घोषणा दिल्या तसेच ‘हिरवेगार भविष्य आपले ध्येय’ हा संदेश देत सहभाग नोंदविला. उपस्थितांनी स्वच्छ, हिरवेगार व शाश्वत भविष्य घडविण्याचा संकल्प केला.