पिंपरी-चिंचवड

मावळ तालुक्यात ६० गावांमध्ये दुर्गामाता दौड

CD

ऊर्से, ता. २२ ः श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त २२ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान मावळ तालुक्यातील साठपेक्षा अधिक गावांमध्ये श्री दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली आहे.
ही परंपरा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी सुरू केली. त्यांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यापूर्वी जिजामातांनी नवरात्रात देवीची आराधना करून देशासाठी रक्षणाची प्रार्थना केली होती. त्यातूनच शिवछत्रपती जन्माला आले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.
आजही देशासमोर अनेक अडचणी आणि आव्हाने आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी आणि तरुणांमध्ये देशभक्ती, नशामुक्त जीवनशैली आणि शिवशाही विचार रुजवण्यासाठी दुर्गामाता दौड काढली जाते. दौडीत दररोज सकाळी गावातील शिवभक्त पारंपरिक पोशाख घालून, भगवा झेंडा घेऊन, देवीच्या मंदिराजवळ एकत्र येतात आणि नंतर पायाने संपूर्ण गावातून दुर्गामाता दौड काढतात. या वर्षी मावळ तालुक्यात साठहून अधिक गावांमध्ये ही दौड उत्साहात पार पडत आहे.

(फोटो क्रमांक: BBD25B03433)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Red Fort Blast: विमा पॉलिसीमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा समावेश असतो का?

Mumbai Local: मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर धावणाऱ्या १५ डब्यांच्या ट्रेनची संख्या वाढणार! नवीन वेळापत्रक कधी जाहीर होणार?

Maldives Airport: विमानतळ ठरेल समृद्धीचे प्रवेशद्वार; मोईझ्झू, भारताच्या सहकार्याने प्रकल्प पूर्ण

Latest Marathi Breaking News : रूपाली ठोंबरे उद्या अजित पवारांची भेट घेणार

दिल्ली स्फोटात सेकंड हॅन्ड गाडीचा वापर : जुन्या कारची खरेदी-विक्री करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT