पिंपरी-चिंचवड

क्रीडा स्पर्धेत आढे शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

CD

ऊर्से, ता. १५ : यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा महोत्सवांतर्गत केंद्रस्तरीय आणि बीटस्तरीय कला व क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यात आढे येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
बीट स्तरावर वेदांत ठाकर याने बुद्धिबळ तसेच थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. आर्यन विश्वकर्मा यांनी लहान गट, लांब उडी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला. वेशभूषा स्पर्धेत संस्कृती सुतार हिने आणि थाळीफेक स्पर्धेत गायत्री सुतार हिने द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच खो-खो मुले-मोठा गट आणि ख-खो मुली-मोठा गट या दोन्ही स्पर्धांमध्ये आढे शाळेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. यापूर्वीही केंद्रस्तरावर बेडूक उडी व लिंबू चमचा स्पर्धेत स्वरा सुतार हिने द्वितीय क्रमांक मिळवला तर मुली मोठा गटात लंगडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक, कवितागायन, भजन स्पर्धा यामध्येही या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
यशाबद्दल सरपंच सुनीता सुतार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ सुतार, नवरंग सुतार, प्रज्ञा सुतार, रोहिणी खामकर तसेच सर्व सदस्यांनी खेळाडूंचे कौतुक केले. मुख्याध्यापिका आरती मेस्त्री, अमित सारडा, कुंडलिक शिंदे आणि कालिंदी कस्पटे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : 17 वर्षीय कल्याणीचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात हलवला, पोलिसांनी मध्येच थांबवले अंत्यसंस्कार!

१२ कोटींच्या लंबोर्गिनीने भरधाव वेगात गाड्या उडवणाऱ्या उद्योजकाच्या लेकाला अटक; CCTV फूटेज तपासल्यानंतर कारवाई

Inspiring Police Story: स्वत:चा निवडणूक भत्ता दिला होमगार्डला; पाचगणीतील पोलिसाने जपली खाकी वर्दीतील माणुसकी!

Elephant Viral Video: माणसांनाही लाजवलं, हत्तीने मालकासाठी जे केले ते पाहून कोणाच्याही डोळ्यांत येईल पाणी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक

SCROLL FOR NEXT