पिंपरी-चिंचवड

शेतकऱ्यांचे दुःख प्रभावीपणे मांडा ः डॉ.वाघ

CD

भोसरी, ता. ११ ः ‘‘प्रतिके आणि प्रतिमा यांचा योग्य वापर केल्यास काळजाला भिडणारी कविता निर्माण होते. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असूनही तोच आज उपरा झाला आहे. शेती मातीच्या कवितेतून साहित्यिकांनी शेतकऱ्याचे दुःख प्रभावीपणे मांडले पाहिजे,’’ असे मत ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) भोसरी शाखेद्वारे आयोजित ‘शेतीमाती’ कविता स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी स्पर्धेचे परीक्षक कवी भरत दौंडकर, माजी ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, माजी नगरसेवक विलास मडिगेरी, प्रियांका बारसे, डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ. अनु गायकवाड, अरुण इंगळे, राजेंद्र घावटे, भगवान पठारे, प्रा. विलास वाळके, दिनकर मुंडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. वाघ यांनी ‘कोरडे जे शेत आहे, ओलीत झाले पाहिजे. मुक्या जीवांचे दुःख, या बोलीत आले पाहिजे.’ अशी कविता सादर करत मैफिलीत रंग भरला. प्रा. दिगंबर ढोकले लिखित ‘वक्तृत्वासाठी विचारधन- सूत्रसंचालनाचे अंतरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. स्पर्धेतील विजेत्यांचे पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेत शीतल गाजरे, मिलिंद कांभेरे, दत्तात्रेय जगताप, ऐश्वर्या नेहे, मनोहर मोहरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचवा क्रमांक मिळविला. इंद्रजित पाटील, भाऊ गोसावी, वत्सला पवार, विशाल कुलट, प्रकाश पाटील आदींनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले. मसापचे भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. तर मुकुंद आवटे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार! कधी अन् कुठे, IMDने तारीखच सांगितली

Zomato delivery boy accident: झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात पडला उघड्या गटारात अन् मग...

मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेचे काम अंतिम टप्प्यात, प्रवासात पाच तासांची बचत; कधीपासून होणार वाहतूक सुरु?

Mhada House: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाचे घर होणार आणखी स्वस्त, किती टक्क्यांनी घटणार; वाचा अहवाल

PM Modi and Zelenskyy : मोठी बातमी! आता मोदी अन् झेलेन्स्कींचीही झाली चर्चा; जाणून घ्या, कोण काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT