भोसरी, ता. ११ ः भोसरी आणि इंद्रायणीनगर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील चित्रपटसृष्टीमधील तारे - तारकांची हजेरी लागणार आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सव ‘चमकदार’ होणार आहे. या दहीहंड्या फोडण्यासाठी पुण्या-मुंबईतील गोविंदा पथके येणार असल्याने या उत्सवाची अबालवृद्धांना प्रतीक्षा लागली आहे.
भोसरी आणि इंद्रायणीनगर परिसरातील विविध मंडळे, प्रतिष्ठानद्वारे दहीहंडी उत्सवात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील सिने तारे-तारका, समाज माध्यमातील रील स्टार, राष्ट्रीय खेळाडू आदींना आमंत्रित केले जाते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात भोसरीतील दहीहंडीची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
भोसरीतील पीएमटी चौकात श्री भैरवनाथ मंडळाद्वारे साजरी होणाऱ्या दहीहंडी उत्सवात यावर्षी सिनेअभिनेत्री श्रृती हासन, श्रीलिला, दिव्येंदू शर्मा आदी कलाकार हजेरी लावून उत्सवात रंग भरणार आहेत. भोसरीतील पीसीएमसी चौकात छावा प्रतिष्ठान सार्वजनिक दहीहंडी उत्सव २६ वर्ष साजरे करत आहे. या वर्षी उत्सवात हिंदी - मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांसह राष्ट्रीय खेळाडू उपस्थित राहणार आहेत. भोसरीतील इंद्रायणीनगरातील दहीहंडी उत्सवात सिने तारका त्रिधा चौधरी, जिया शंकर आदी हजेरी लावणार आहे. भोसरी गावठाणात फुगे-माने तालीमजवळ वादळ प्रतिष्ठानद्वारेही दहीहंडी उत्साहात साजरीकरण्यात येणार आहे.
लाखो रुपयांची बक्षिसे
भोसरीतील दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळांद्वारे लाखोंची बक्षीसे ठेवली जातात. पुणे - मुंबईसह राज्यातील विविध भागांतील गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी भोसरीत येतात. त्यामध्ये पुरुष गोविंदा पथकांसह माहिला गोविंदा पथकांचाही समावेश असतो. त्यामुळे दहीहंडी उत्सव अधिक जल्लोषात साजरा होतो.
गर्दीचा उच्चांक
भोसरीतील पीसीएमसी चौक आणि पीएमटी चौक येथील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी भोसरीसह पंचक्रोशीतील नागरिक येत असल्याने या परिसरात गर्दीने उच्चांक गाठलेला असतो. त्यामुळे पोलिसांना राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील पुणे - नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागतो. दहीहंडी पाहण्यासाठी उड्डाणपुलावरही नागरिक गर्दी करतानाचे चित्र पाहायला मिळते.
PNE25V39171, PNE25V39173, PNE25V39176
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.