पिंपरी-चिंचवड

गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा...

CD

भोसरी, ता. १७ : पावसाची रिमझिम बरसात...डीजेचा दणदणाट...तरुणांची थिरकणारी पावले...पुरुषांसह महिला गोविंदा पथकांची हजेरी...दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी उभारलेले उंचच उंच मानवी मनोरे...दहीहंडी पाहण्यासाठी उसळलेली प्रचंड गर्दी आणि दहीहंडी फोडण्याचा थरार, अशा वातावरणात भोसरी आणि इंद्रायणीनगर परिसरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला.
भोसरी ग्रामस्थांद्वारे भोसरी गावठाणातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दहीहंडीनिमित्त १० ते १६ ऑगस्टपर्यंत अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये राजाराम महाराज फुगे, संभाजी महाराज फुगे, अंकुश महाराज फुगे, मुकुंद महाराज मोरे, भागवत महाराज शिरवळकर, सोपना महाराज फुगे आदींनी कीर्तनसेवा दिली. शनिवारी (ता. १६) भोसरी गावातून दिंडी काढण्यात आली. भागवत महाराज साळुंके यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर मंदिरात पारंपरिक दहीहंडी फोडण्यात आली. भाविकांना महाप्रसादाचे वाटप झाले.
भोसरीतील छावा प्रतिष्ठानद्वारे पीसीएमसी चौकात आयोजित २६ व्या दहीहंडी उत्सवात सिनेतारका मोनालिसा, सूरज चव्हाण, विनीतकुमार सिंह आदींनी हजेरी लावून दहीहंडीत रंग भरला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक संजय वाबळे, मोरेश्वर भोंडवे, नीलेश बारणे, भीमाबाई फुगे आदींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी गणेश म्हस्के, सचिन कंद, प्रदीप कंद, स्वप्नील फुगे, प्रवीण माझीरे, प्रीतम शिंदे, विनोद गव्हाणे आदी उपस्थित होते. मुंबईच्या जय बजरंग दहीहंडी महिला पथकाने दहीहंडी फोडली.

श्रीलिला, श्रृती हसनची ‘चमक’
भोसरीतील पीएमटी चौकात श्री भैरवनाथद्वारे आयोजित दहीहंडी उत्सवात आमदार महेश लांडगे, आयोजक योगेश लांडगे आदींसह माजी नगरसेवक- नगरसेविका उपस्थित होते. यावेळी सिनेतारका श्रुती हसन, श्रीलिला, दिव्येंदू शर्मा आदींनी उपस्थिती लावत दहीहंडीत उत्साह भरला. यावेळी प्रो-कबड्डीतील यु मुंबाच्या खेळाडूंनी हजेरी लावली. या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

त्रिधा चौधरी, जिया शंकरची हजेरी
भोसरीतील इंद्रायणी युवा प्रतिष्ठानद्वारे आयोजित दहीहंडीत सिनेतारका त्रिधा चौधरी, जिया शंकर आदींनी हजेरी लावत रंग भरला. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, कामगार नेते सचिन लांडगे, लघुउद्योजक श्याम अगरवाल, शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक रवी लांडगे, विलास मडिगेरी, सीमा सावळे आदींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार सहाणे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. चाकणमधील झित्राई देवी गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. पथकाने अध्यक्ष सत्यवान बनकर यांनी पारितोषिक स्वीकारले.

पारंपरिक ओडिशी गीते
महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि निलांचल मित्र मंडळाद्वारे दहीहंडीनिमित्त पश्चिम ओडिशातील पारंपरिक कीर्तन समूह माँ माहेश्वरी सकीर्तन मंडळीच्या बुडामल सहेला, गायिका निकिता आणि सरिता बेहरा यांनी पारंपरिक ओडिसी गीते व नृत्येही सादर केली. यावेळी संजय परीडा, गोवर्धन नायक, परदेशी साहू, तपन राऊत, गरुड दास, श्रीनिवास प्रधान, दिलीप स्वेन, आशिष कुमार आदीसह ओडिसी नागरिक बहुसंख्य उपस्थित होते. जितेंद्र मिश्रा यांनी सूत्रसंचालन केले. भोसरीतील वादळ प्रतिष्ठान, फुगे-माने तालीम मंडळ आणि समस्त गव्हाणे तालीम यांच्याद्वारे भोसरी गावठाणातील मारुती मंदिराजवळ दहीहंडी फोडण्यात आली. दुपारी फोडण्यात आलेल्या या दहीहंडीचा हजारो नागरिकांनी आनंद लुटला.

गर्दीचा उच्चांक
भोसरीतील पीसीएसी चौक आणि पीएमटी चौकातील दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे भोसरीतील पीसीएमसी चौक, चांदणी चौक, पीएमटी चौक आदी भागांतील रस्त्यावर नागरिकांची प्रचंड गर्दी दिसली. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता बंद केला होता. अशीच गर्दी इंद्रायणीनगरातील इंद्रायणी युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीला पाहायला मिळाली.

चिखलीत सात थर
चिखली : चिखली परिसरात घरकुल येथे नीलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशनच्यावतीने आयोजित दहीहंडी उत्सवात चेंबूर येथील साई सिद्धी मंडळ गोविंदा पथकाने सात थर लावून दहीहंडी फोडली. यावेळी अभिनेत्री ऋतुजा शिंदे हिने हजेरी लावली.
चिखली साने चौक येथील वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल व दत्ताकाका साने प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये चाकण, मुंबई तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील एकूण दहा पथकांनी सलामी दिली. त्यानंतर चेंबूर येथील
दत्तकृपा गोविंदा पदकाने दहीहंडी फोडून बक्षीसाचा मान मिळवला. यावेळी लावणी, पोवाडे इत्यादी कार्यक्रम पाहण्याचा आनंद प्रेक्षकांनी लुटला.

PNE25V40580

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

SCROLL FOR NEXT