पिंपरी-चिंचवड

मैलापाण्याने घरांत बसणे, रस्त्यावर फिरणे असह्य

CD

भोसरी, ता. १८ ः भोसरीतील बीआरटीएस टर्मिनल, गंगोत्री पार्क आणि दिघीतील इंदूबन सोसायटीच्या पाठीमागील बाजू, भारतमातानगर भागांतील रस्त्यांवरील मैलापाण्याची समस्या नागरिकांना असह्य झाली आहे. दुर्गंधीने घरात बसणे अथवा पायी चालणेही अशक्य होत असून वाहनांमुळे हे पाणी अंगावर उडत असल्याचा किळसवाणा प्रकार घडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र, पाऊस नसतानाही महापालिका प्रशासन ढिम्मच असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून भोसरीतील दिघी रस्त्यावरील गंगोत्री पार्कमधील बॅडमिंटन हॉलच्या पाठीमागील रस्त्यावरील चेंबर सतत तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. हे चेंबर रस्त्यावरच असल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बंगले आणि इमारती आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना वारंवार असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे घरांत बसणेही अवघड झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपासून दिघीतील भारतमातानगरवरून गायरानातून आळंदी रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर जमा होत आहे. दिघीकरांना आळंदी रस्ता, भोसरीकडे येण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यातच येथील चेंबरजवळ मोठा खड्डा पडल्याने वाहने त्यात अडकून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. गटाराच्या दुर्गंधीयुक्त मैलापाण्याचे तळे रस्त्यावर जमा होत असल्याने वाहन चालक आणि पादचाऱ्यांना तोंडावर हात ठेवूनच या रस्त्याने पुढे जावे लागते. गंगोत्री दिघी रस्त्यावरील इंदूबन सोसायटीच्या पाठीमागील बाजूचेही गटार वारंवार तुंबण्याचा प्रकार घडत आहे.

चालकांना उलट्यांचा त्रास
भोसरीतील बीआरटीएस टर्मिनलजवळ सार्वजनिक स्वच्छतागृहाची सांडपाणी वाहिनी खराब झाल्याने स्वच्छतागृहातील मैला रस्त्यावरून वाहत आहे. त्याचप्रमाणे वाहनांमुळे हा मैला अंगावर उडत असल्याने काही वाहन चालकांना उलट्याचा त्रास होत आहे. त्याचप्रमाणे याच ठिकाणी असलेली गटाराची वाहिनी देखील वारंवार तुंबण्याचा प्रकार होत आहे. आठवड्यातून एकदा या गटाराचे पाणी रस्त्यावर जमा झाल्याचे पाहायला मिळते. त्याचप्रमाणे हे दुर्गंधीयुक्त पाणी चार-पाच दिवस रस्त्यावर साचून राहत असल्याने येथील व्यावसायिकांनाही समस्येचा सामना करावा लागत आहे.

दिघीकरही पेचात
दिघीतील नागरिकांना भोसरी आणि शहर परिसरात येण्यासाठी गंगोत्री पार्क आणि आळंदी रस्त्यावरील रामस्मृती लॉन्सजवळून येण्याचे मार्ग होते. मात्र, हे मार्ग जागा मालकांद्वारे वारंवार बंद करण्यात येत असल्याने दिघीकरांची रस्त्याची समस्या निर्माण झाली होती. गंगोत्री पार्क आणि भारतमातानगरजवळून रीतसर रस्ता झाल्याने रस्त्याची समस्या सुटली आहे. परंतु, या रस्त्यावरील तुंबणाऱ्या गटाराच्या दुर्गंधीयुक्त पाण्याच्या समस्येने दिघीकर त्रस्त झाले आहेत.

आणखी वाट पहावी लागणार ?
गटारांच्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हे पाणी अंगावर उडाल्याने त्वचेला खाज येत असल्याच्याही तक्रारी काही नागरिकांच्या आहेत. पावसाळा सुरू असल्याने रस्ता खोदता येत नसल्याचे एका जलनिस्सारण अधिकाऱ्याने सांगितले. त्याचप्रमाणे काम करण्यास आणखी दोन महिने लागणार असल्याचेही या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. मात्र, पावसाळा नसतानाही गटाराचे चेंबर तुंबण्याचा प्रकार होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.


गंगोत्री पार्कमधील बॅडमिंटन हॉलच्या मागील गटाराची वाहिनी मानसी अपार्टमेंटमधून गेली आहे. मात्र, अपार्टमेंटमधील सोसायटीधारक वाहिनीच्या दुरुस्तीमध्ये अडवणूक करत आहेत. त्यामुळे महापालिका येत्या दोन दिवसांत सोसायटीला नोटिस बजावणार आहे. त्यानंतर येथील गटाराच्या दुरुस्तीचे काम करण्यात येईल.
- प्रियांका म्हस्के, कनिष्ठ अभियंता, जलनिस्सारण, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय

दिघीतील भारतमातानगरजवळील गायरानातून आळंदी रस्त्याला
जोडणाऱ्या चेंबरची पाहणी करण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांना पाठविण्यात येईल. त्यानंतर दुरूस्तीसाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- राजेंद्र डुंबरे, उपअभियंता जलनिस्सारण, ‘क’ व ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड महापालिका

गंगोत्री पार्कमधील वारंवार तुंबणाऱ्या गटाराच्या पाण्यामुळे दुचाकी वाहने रस्त्यावरून वारंवार घसरण्याचे प्रकार घडत आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांद्वारे तुंबलेल्या गटाराचे ‘चोकअप’ काढण्यात येते. मात्र, पुन्हा चार-पाच दिवसांनी गटार तुंबते. हे गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सुरू आहे.
- दीपक झिरपे, स्थानिक नागरिक, गंगोत्री पार्क
BHS25B03179

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

SCROLL FOR NEXT