पिंपरी-चिंचवड

पाठदुखीचा त्रास; वर वाहन दुरुस्तीचाही खर्च !

CD

भोसरी, ता. १७ ः परतीच्या पावसाने भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर आणि भोसरी एमआयडीसीतील काही रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहेत. त्याने वाहन चालकांना पाठदुखीच्या त्रासाबरोबरच वाहन दुरुस्तीच्या खर्चालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी न करता रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी वाहन चालक आणि नागरिकांमधून होत आहे.
पावसाळ्यात भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर आणि भोसरी एमआयडीसीतील काही रस्त्यांवरील खड्डे पिंपरी चिंचवड महापालिकेने भरले. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने काही रस्त्यांवरील खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांतील खडी रस्त्यांवर विखुरली असल्याने वाहने घसरण्याचाही धोका निर्माण झाला आहे.
खड्ड्यांतून सतत प्रवास केल्याने वाहन चालकांना पाठदुखीचा त्रास होत आहे. त्याचप्रमाणे खड्ड्यांत वाहने आदळून ती नादुरुस्तही होत आहेत. त्यामुळे दवाखान्यासह वाहन दुरुस्तीच्या खर्चाचा नाहक त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.

तब्बल तीन फुटांचा खड्डा
भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील एचडीएफसी बॅंकेजवळ तीन साडेतीन फूट खोल खड्डा पडला आहे. वाहन चालकाच्या निदर्शनास हा धोकादायक खड्डा येण्यासाठी काही नागरिकांनी त्यामध्ये लाकूड टाकून त्यावर पोते बसविले आहे.

कुठे आहेत खड्डे ?
भोसरी
- पुणे - नाशिक महामार्गावर लांडेवाडीतील ऐतिहासिक प्रवेशद्वार व एचडीएफसी बॅंकेसमोर
- पुणे - नाशिक महामार्ग सेवा रस्ता संत ज्ञानेश्वर बॅंक्वेट हॉलसमोर
- भोसरी गावठाण मारुती मंदिराजवळ
- पीसीएमसी चौक, लांडेवाडी चौक

दिघी
- सह्याद्री कॉलनी क्रमांक तीन समोरील रस्ता
- भारतमातानगर कॉलनी क्रमांक तीनकडून आळंदी रस्त्याला जोडणारा रस्ता
- पालखी मार्गावरील विठ्ठल मंदिरासमोरील चौक
- संत निरंकारी मंडळासमोरील रस्ता

इंद्रायणीनगर
- श्री तिरुपती बालाजी चौक
- इमारत क्रमांक ४७ व ४८ समोरील रस्ता
- मोरया चौक

भोसरी एमआयडीसी
- जे ब्लॉक प्लॉट क्रमांक ३८१ समोरील रस्ता
- पेठ क्रमांक दहामधील जे २४० मधील जय गणेश स्टील कंपनीसमोर


पुणे - नाशिक महामार्गावर लांडेवाडी चौकात पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्याने चर पडली आहे. भरधाव वेगात असलेल्या वाहन चालकांच्या निदर्शनास ती पटकन येत नसल्याने या चरीत वाहने आदळून पडत आहे. महापालिकेने ही चर तीन वेळा भरली आहे. मात्र, तीन-चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पुन्हा चर उघडी पडली आहे.
- नरेश सुभेदार, वाहन चालक

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निकृष्‍ट कामामुळे रस्त्यावर वारंवार खड्डे पडत आहेत. त्याने वाहन चालकाला अपघात होऊन जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने वाहन चालकांच्या जीवाशी न खेळता रस्त्याचे काम उत्कृष्टपणे केले पाहिजे.
- रामचंद्र पन्हाळे, वाहन चालक

इंद्रायणीनगर आणि भोसरी एमआयडीसीतील रस्त्यांवरील पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरूच आहे. पावसाने उघडीप दिल्यावर रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणाने बुजविण्यात येणार आहेत.
- सुनीलदत्त नरोटे, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), ‘क’ क्षेत्रीय कार्यालय


येत्या दोन दिवसांत भोसरी आणि दिघीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे इतर रस्त्यांची पाहणी करण्यात येईल. त्यावरीलही खड्ड्यांचे डांबरीकरण करण्यात येईल.
- शिवराज वाडकर, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय

BHS25B03238

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT