पिंपरी-चिंचवड

संत ज्ञानेश्वर महाराज हे वैश्विक संत ः डॉ. सबनीस

CD

भोसरी, ता. २४ ः ‘‘संत ज्ञानेश्वर महाराज हे वैश्विक संत असून त्यांचे तत्वज्ञान हे सर्वांना सामावून घेणारे आहे. भेदरहित आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही चारही भावंडे हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यामध्ये मुक्ताईचा अधिकार मोठा आहे आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात कीर्तनकार सुभाष महाराज गेठे यांच्या ताटीच्या अभंगावरील प्रवचनाचे ‘श्री संत मुक्ताईंचे ताटीचे अभंग व चरित्र’ आणि प्रा. दिगंबर ढोकले लिखित ‘सूत्रसंचालनाचे अंतरंग’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शांतीब्रह्म मारोती महाराज कुऱ्हेकर, डॉ. नारायण महाराज जाधव, सुनिताराजे पवार, बाजीराव चंदिले महाराज, उल्हास महाराज सूर्यवंशी, महेश महाराज भगुरे, राजेश अगरवाल, सुदाम भोरे आदींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, पंडित गवळी, सागर गवळी, अशोक पगारिया, प्रवीण ढोकले, अरुण बोऱ्हाडे, शिवलिंग ढवळेश्वर, राहुल गवळी, सतीश गोरडे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी ग्रंथ दिंडीत श्रीराम विद्या मंदिराच्या विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले. ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या नाटिकेने उपस्थितांचे लक्ष वेधले. मीरा काटमोरे, भार्गव जाधव, महेश महाराज भगुरे यांनी ताटीचे अभंगांचे गायन केले. मुरलीधर साठे यांनी स्वागत केले. डॉ. रोहिदास आल्हाट यांनी प्रास्ताविक केले. मुकुंद आवटे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: 'एमपीएससीच्या परीक्षेला २१५५ जणांची दांडी'; सोलापूर शहरातील १४ उपकेंद्रांवर ३३१० जणांनी दिली परीक्षा

Latest Marathi Breaking News : आजपासून नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम

Ranji Trophy: विदर्भाला पहिल्या डावात आघाडीची संधी; रणजी करंडक, विदर्भाच्या २८६ धावांना ओडिशाचे ६ बाद १२२ असे उत्तर

Tarak Mehta: ‘तारक मेहता....’मध्ये भव्या गांधीचे पुनरागमन?

हेलिकॉप्टर बैज्या - ब्रेक फेल जोडीनं जिंकली फॉर्च्युनर, पुढच्या वर्षी BMWचं असणार बक्षीस; चंद्रहार पाटलांची घोषणा

SCROLL FOR NEXT