पिंपरी-चिंचवड

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती भोसरीतील शाळेमध्ये उत्साहात

CD

भोसरी, ता. २९ ः रयत शिक्षण संस्थेच्या भोसरीतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात प्रणिता शिरोडे, मोठ्या गटात समृद्धी कांबळे यांनी तर निबंध स्पर्धेत सई रणखांबे आणि गायन स्पर्धेत तन्वी जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळविले.
माजी नगरसेवक अजित गव्हाणे, रयत शिक्षण संस्था पश्चिम विभागाचे सल्लागार समितीचे सदस्य सुदाम शिंदे, सतीशचंद्र जकाते, गोरख गवळी, धैर्यशील पवार, वसंत कदम, जयश्री सोनवणे आदींच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक दत्तात्रेय गायकवाड, नीलम राजगुरू, माणिक जयद, प्राचार्य शिवदास देठे आदी उपस्थित होते. शाळेचे स्थानिक सल्लागार मंडळ उपाध्यक्ष सुधीर बकरे, मदन सोलंकी, अशोक लांडगे यांनी शाळेला प्रत्येकी पन्नास हजाराच्या मदतीचा धनादेश दिला. कार्यक्रमासाठी पल्लवी रहाटे, मोनिका घुले, माधुरी सहाने, वैशाली खानझोडे, भगवान नितनवरे, रेखा सुरवसे आदींनी परिश्रम घेतले.
पारितोषिक विजेते अन्य स्पर्धक पुढील प्रमाणे ः वक्तृत्व स्पर्धा - (लहान गट) दीपश्री पाटील (द्वितीय), रेणुका मालखेडे (तृतीय). मोठा गट ः संस्कृती फराळ (द्वितीय), नंदिनी ब्रह्मराक्षे (तृतीय). निबंध स्पर्धा ः लहान गट - जेसिका मोहोड (द्वितीय), रेणुका मालखेडे (तृतीय). गायन ः प्रणिता शिरोडे (द्वितीय), पूर्वा शेजवळ (तृतीय).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chief Justice of India : न्यायमूर्ती सुर्यकांत यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ; छोट्या गावातील वकील ते देशातील सर्वोच्च पदाला गवसणी...

'ये जवानी'ची जोडी परत येणार? रणबीर-दीपिका पुन्हा एकत्र काम करणार? पिकाच्या छोट्याशा रिअ‍ॅक्शनमुळे चाहत्यांमध्ये चर्चा

TET Exam : “माझी परीक्षा महत्त्वाची की लग्न?”; मुलाच्या प्रश्नाने हतबल पित्याच्या डोळ्यात अश्रू, नेमकं काय घडलं?

"मी अभिनयक्षेत्र सोडून समाजसेवा..." जोगवा सिनेमा केल्यानंतर मुक्ताची झालेली ही अवस्था; "पुन्हा ती भूमिका.."

Uranium In Breast Milk : बालपणच धोक्यात? स्तनदा मातांच्या दुधात आढळले युरेनिअम, देशातील 'या' सहा जिल्ह्यांत धक्कादायक बाब समोर

SCROLL FOR NEXT