पिंपरी-चिंचवड

वाहनतळ सुविधेत आचारसंहितेचा अडथळा

CD

भोसरी, ता. २६ ः येथील आळंदी रस्त्यावरील कै. श्री ज्ञानेश्वर (माऊलीदादा) सोपानराव गवळी वाहनतळाचे उद्‍घाटन होऊन सहा महिने उलटले आहेत. यानंतरही ही सुविधा बंदच असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आळंदी रस्त्यावर वाहने दुतर्फा लावण्यात येतात. परिणामी वाहतूक कोंडी होते. महापालिकेच्या नगररचना विभागाने वाहनतळाची भाडे निश्चिती केली आहे, मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे निविदा प्रसिद्ध करता येत नसल्याचे भूमी जिंदगी विभागाचे म्हणणे आहे.
हा पिंपरी चिंचवड शहरातील पहिला चार मजली वाहनतळ आहे. महापालिकेच्या ‘इ’ प्रभागाच्या स्थापत्य विभागाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वाहनतळाचे काम पूर्ण केले. जुलै महिन्यात उद्‍घाटनानंतर पुढील कार्यवाहीसाठी वाहनतळाचे सप्टेंबर महिन्यात भूमी जिंदगी विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर भाड्याने देण्यासाठी वाहनतळ नगररचना विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. प्रत्येक विभागाने या कामात तत्परता दाखवली नसल्याने एक वर्षांनंतरही वाहनतळ सुरू झालेला नाही.
आळंदी रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे, पण रस्त्यावरील पदपथांवर विक्रेते आणि हातगाडी चालकांनी अतिक्रमण केले आहे. मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यावरील जागा त्यामुळे आणखी कमी झाली आहे. पूर्वी सम-विषम पार्किंगचे नियोजन होते. तसे फलकही लावण्यात आले होते, मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. ग्राहक आणि दुकानदारांनी दुकानासमोरील रस्त्यावर दुचाकी आणि चार चाकी वाहने लावली आहेत. त्यामुळे रहदारीत अडथळा येतो. याचा सर्वांनाच त्रास होतो. हा वाहनतळ सुरू झाल्यावर या रस्त्यावर सम-विषम पार्किंगचे नियोजन करण्यात येईल, असे भोसरी वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.

दुर्लक्षामुळे कचराकुंडी
वाहनतळ सुरू न झाल्याने त्याची दुरवस्था होऊ लागली आहे. प्रवेशद्वारापाशी आणि तळमजल्यावर कचऱ्याचे ढीग पडले आहेत. तेथे कचराकुंडीच झाली आहे. थंडीपासून वाचण्यासाठी काही जण वाहनतळाच्या भिंतीजवळ कचरा जाळतात. त्यामुळे भिंत काळी झाली आहे. तेथे काही तळीरामांना अड्डा केल्याचे काही नागरिकांनी सांगितले. तळ मजल्यावर मद्याच्या बाटल्या पडलेल्या असतात.
---
महापालिकेच्या नगररचना विभागाने भोसरीतील आळंदी रस्त्यावरील वाहनतळाची भाडेनिश्चिती करून तो प्रस्ताव भूमी जिंदगी विभागाकडे आठ दिवसांपूर्वी पाठविला आहे, मात्र महापालिकेच्या निवडणुकीमुळे निविदा प्रसिद्ध करण्यात येत नाही. आचारसंहितेनंतर निविदा प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर योग्य कार्यवाही करून वाहनतळ सुरू करण्यात येईल
- सीताराम बहुरै, उपायुक्त, भूमी जिंदगी विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Mayor : चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर, काँग्रेसला मोठा धक्का; पडद्याआड नेमकं काय घडलं ?

Valentines Day: प्रपोजसाठी वाघोबालाही करावी लागते वणवण अन् लावतात जीवाचीही बाजी; वाघिणीला कसं करतात इम्प्रेस?

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, रुबीहॉल क्लिनिकमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली माहिती

Chhatrapati Sambhajinagar: संजय शिरसाटांच्या इगोचे पानिपत! पालकमंत्रिपदाच्या वर्षपूर्तीनंतर अवघ्या महिन्यात दुसरी हार, गटबाजीचा फटका, काय घडलं?

'अत्यंत वाईट एरियामध्ये शूट करतेय..' जुई गडकरी स्पष्टच बोलली, म्हणाली...'मेडिकल इमर्जन्सी...'

SCROLL FOR NEXT